राष्ट्रीय

ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि अश्वशर्यतीवर जीएसटी आकारला जाणार

भरपाईची यंत्रणा आणि राज्यांची महसूल स्थिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्था

जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि अश्वशर्यतीवर २८ टक्के जीएसटी आकारला जाण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. २८-२९ जून रोजी जीएसटी परिषदेची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली २८-२९ जून रोजी चंदिगड येथे जीएसटी परिषदेची ४७ वी बैठक होणार आहे. यामध्ये सर्व राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होणार आहेत. भरपाईची यंत्रणा आणि राज्यांची महसूल स्थिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जीएसटी टॅक्स स्लॅबवरही चर्चा होऊ शकते.

राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीचे प्रमुख आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांच्या समितीने ऑनलाईन गेमिंगवर भाग घेणाऱ्या स्पर्धेच्या प्रवशेफीसह संपूर्ण २८ टक्के जीएसटी आकारण्यात यावा, असे म्हटले आहे.

कॅसिनोबाबत मंत्र्यांच्या समितीने म्हटले आहे की, चीप्स/कॉईन्स खरेदीच्या संपूर्ण दर्शनीमूल्यावर खेळाडूंकडून बेटिंगच्या प्रत्येक फेरीसह आधीच्या फेरीत विजयी झालेल्या रकमेवरही जीएसटी आकारावा. तसेच कॅसिनोच्या प्रवेश फीवर आणि तेथील अन्नपदार्थ, शीतपेये यांच्यावर संपूर्ण २८ टक्के जीएसटी आकारण्याचा सल्ला समितीने दिला आहे.

सध्या कॅसिनो, अश्वशर्यत आणि ऑनलाईन गेमिंगवर सध्या १८ टक्के जीएसटी आकारला जातो. या सेवेच्या मूल्यावर राज्यांच्या अर्थमंत्र्यांची समिती निर्णय घेईल. सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग पोर्टल आणि अश्वशर्यतीवर किती जीएसटी आकारायचा यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांची समिती नेमली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी