ज्ञानेश कुमार निलंबन : याचिकेवर लवकरच सुनावणी संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

ज्ञानेश कुमार निलंबन : याचिकेवर लवकरच सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तयारी दर्शवली आहे.

Swapnil S

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तयारी दर्शवली आहे. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांच्या मंजुरीशिवाय आणि बहुमताशिवाय एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. पाटण्याचे रहिवासी राकेश कुमार सिंह यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

घटनात्मक तरतुदींनुसार, बहुसदस्यीय निवडणूक आयोगाचे निर्णय एकतर सर्वानुमते किंवा बहुमताने घेणे बंधनकारक आहेत. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे वैयक्तिक पातळीवर अधिकार वापरत आहेत का, याची चौकशी करून ते बेकायदेशीर असल्याचे घोषित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

निलंबनाची मागणी

अंतिम सुनावणी होईपर्यंत ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात यावे, जेणेकरून निवडणूक आयोगाचे बहुसदस्यीय स्वरूप टिकून राहील. तसेच या काळात आयोगाचे कामकाज इतर दोन निवडणूक आयुक्त - सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी - यांच्या सर्वसम्मतीने चालवावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. नोंदणी नियम, १९६० मध्ये कोणतीही दुरुस्ती न करता 'फॉर्म-६' मध्ये बदल करण्यात आल्याचा आक्षेप, निवडणूक आयोगाच्या मतदारयादी डेटाबेसवरील मध्यवर्ती नियंत्रणाबाबत आणि आयटीकामांच्या वाटपाबाबत आक्षेप, पश्चिम बंगालमधील अपील न्यायाधिकरणांसमोर निवडणूक आयोगाच्या नावाने दाखल करण्यात आलेल्या अपिलांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह आदी मुद्दे याचिकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत पुढील आठवड्यात सुनावणी निश्चित केली असून, न्यायालयाच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'त्या' तालुक्यांनाही मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

औषधांच्या दरवाढीवर ‘सर्वोच्च’ संताप; ‘कॅन्सर’ औषधांच्या १० पट जास्त नफा कमावण्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Mumbai : अतिक्रमणांवर हातोडा; दादर स्थानक परिसरात पदपथ झाले मोकळे, ‘जी’ उत्तर विभागाची कारवाई

निवडणुकांमध्ये ‘फिक्सिंग’! राहुल गांधी, खर्गे यांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल; रस्त्यावर, संसदेतही संघर्ष सुरूच ठेवणार, काँग्रेसचा निर्धार

दक्षिण मुंबईतील घरसाठा ७४ टक्क्यांनी घटला; मुंबईच्या पलीकडे रिअल इस्टेटचा विस्तार, पश्चिम परिघीय भागात २४० टक्क्यांची वाढ