राष्ट्रीय

हल्द्वानी हिंसाचार: उत्तराखंड सरकारने केंद्राकडे अतिरिक्त फौजफाटा मागितला

जवळपास ११०० सुरक्षा कर्मचारी आधीच शहरात तैनात आहेत. बनभूलपुरा येथे अजूनही दुकाने बंद असून रस्ते सुनसान आहेत.

Swapnil S

हल्द्वानी : उत्तराखंड सरकारने हल्द्वानी येथे ८ फेब्रुवारी रोजी बेकायदेशीर मदरसा पाडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे आणखी केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्यांची मागणी गेली आहे.

या संबंधात सरकारी अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जमावाच्या हिंसाचाराचा केंद्रबिंदू असलेल्या बनभूलपुरा भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या प्रत्येकी १०० कर्मचारी असलेल्या चार कंपन्या गृह मंत्रालयाकडून मागविण्यात आल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी ही मागणी केंद्राकडे पाठवली होती. बनभूलपुरा भागात संचारबंदी कायम आहे, परंतु शहराच्या बाहेरील भागात ती उठवण्यात आली आहे. जवळपास ११०० सुरक्षा कर्मचारी आधीच शहरात तैनात आहेत. बनभूलपुरा येथे अजूनही दुकाने बंद असून रस्ते सुनसान आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले