राष्ट्रीय

पंतप्रधानांच्या बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

उल्लेखनीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे मनोरंजन केले

वृत्तसंस्था

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन मंगळवारी आपला ८० वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांच्यावर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिग बी यांना शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

“अमिताभ बच्चनजी यांना ८० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ते भारतातील सर्वात उल्लेखनीय चित्रपट व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, ज्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आणि त्यांचे मनोरंजन केले. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो,’’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिने त्यांचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. दुसरीकडे, बिग बींची नात नव्या नवेली नंदा हिनेदेखील आजोबांचा फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये हरिवंशराय बच्चन यांची कविता ‘अग्निपथ’ लिहिली आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश