Himachal Pradesh : जमिनीपासून हजारो फूट उंचीवर बर्थडे सेलिब्रेशन; पॅराग्लायडिंग करत महिलेने कापला केक, VIDEO व्हायरल (Instagram व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
राष्ट्रीय

Himachal Pradesh : जमिनीपासून हजारो फूट उंचीवर बर्थडे सेलिब्रेशन; पॅराग्लायडिंग करत महिलेने कापला केक, VIDEO व्हायरल

पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळात केक कापण्यासारखी कृती करणे योग्य आहे का, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

वाढदिवस म्हटला की केक, पार्टी आणि मित्रमंडळींसोबत सेलिब्रेशन असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, हिमाचल प्रदेशातील एका महिलेने आपला वाढदिवस चक्क आकाशात साजरा केला. बीर बिलिंग येथे पॅराग्लायडिंग करताना तिने सोबत केकही नेला आणि हवेतच तो कापून वाढदिवस साजरा केला. तिच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण तिच्या हटके कल्पनेचे कौतुक करत आहेत, तर काहींनी पॅराग्लायडिंगदरम्यान अशा प्रकारे केक कापणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हवेतच कापला केक

व्हायरल व्हिडीओमध्ये ही महिला एका पायलटसोबत टँडम पॅराग्लायडिंगचा आनंद घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तिने आपल्यासोबत वाढदिवसाचा केकही नेला आहे. जमिनीवर उतरल्यानंतर केक कापण्याऐवजी तिने हवेत उडत असतानाच केक कापण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर तिने स्वतःसाठी वाढदिवसाचे गाणेही गायले.

यावेळी पायलट हिंदीत म्हणतो, "देखिए मॅडम जी, अब अपना केक काटने वाली हैं." म्हणजेच, 'पाहा, आता मॅडम आपला केक कापणार आहेत.' महिला केक कापण्याच्या तयारीत असताना पायलट तिला केक खाली पडू देऊ नका, अशी सूचनाही करतो. या अनोख्या सेलिब्रेशनचा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

अनोख्या सेलिब्रेशनवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा

या महिलेचा हवेत वाढदिवस साजरा करण्याचा अंदाज काहींना आवडला आहे. मात्र, अनेकांनी या कृतीमुळे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळात केक कापण्यासारखी कृती करणे योग्य आहे का, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हवेत असताना अशा प्रकारे केक कापल्याने लक्ष विचलित होऊ शकते, तसेच हालचालींमुळे अडचण निर्माण होण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली आहे. एका सोशल मीडिया युजरने प्रतिक्रिया देताना, "तिने केक सोबत नेलाच कशासाठी? पॅराग्लायडिंग हे अशा गोष्टी करण्यासाठी नाही," असे म्हटले आहे.

एकीकडे या महिलेच्या अनोख्या सेलिब्रेशनचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे साहसी खेळांदरम्यान सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ केवळ वाढदिवसाच्या हटके सेलिब्रेशनमुळेच नव्हे, तर सुरक्षेच्या चर्चेमुळेही व्हायरल झाला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्द

'भूकंप होतोय, लँडिंग थांबवा'; विमान धावपट्टीवर उतरणार इतक्यात हादरली जमीन, लॉस एंजेलिस विमानतळावरील थरारक VIDEO व्हायरल

दुष्काळाविरुद्ध लोकचळवळ उभारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा शुभारंभ

Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या

BMC शाळांतील विद्यार्थी जाणार सिंगापूरला; वैज्ञानिक क्षेत्रातील अनुभव घेत भरारी घेणार; ३५ विद्यार्थी अन् पाच शिक्षकांचा सहलीत समावेश