Assam : हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ 
राष्ट्रीय

Assam : हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

आसाममध्ये ऐतिहासिक विजय मिळवत हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Swapnil S

गुवाहाटी : आसाममध्ये ऐतिहासिक विजय मिळवत हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ईशान्येकडील या राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे हे सलग तिसरे सरकार आहे. सरमा यांच्यासोबत अन्य चार आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. गुवाहाटी येथील खानापारा भागातील व्हेटर्नरी ग्राउंडवर आयोजित एका सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सरमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

रामेश्वर तेली (भाजप), अजंता नेओग (भाजप), अतुल बोरा (आसाम गण परिषद), चरण बोरो (बोडोलँड पीपल्स फ्रंट) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, या सोहळ्याला पंतप्रधान नरेन्द्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सर्बानंद सोनोवाल आणि पवित्रा मार्गेरिटा उपस्थित होते. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेतेही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पारंपारिक 'धोती-कुर्ता' आणि गळ्यात 'गामोसा' परिधान करून आसामी भाषेत शपथ घेतली. त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या चार मंत्र्यांपैकी तिघांनी आसामी भाषेत, तर बीपीएफचे मंत्री चरण बोरो यांनी बोडो भाषेत शपथ घेतली. "माँ कामाख्या, महापुरुष श्रीमंत शंकरदेव आणि आसामच्या जनतेच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आम्ही जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे सरमा यांनी एक्सवर म्हटले आहे.

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

फडणवीस अचानक दिल्लीला, चर्चांना उधाण; भेटीगाठींबाबत गुप्तता, काही तासांनंतर नागपुरात परत

महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : TET पेपरफुटीचा सूत्रधार अटकेत

Shahapur : भातसा वाहू लागले; मुंबईकरांची चिंता मिटली