राष्ट्रीय

विवस्त्र होऊन मंदिरात गेली, देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी; सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यूमागचं गूढ काय?

हैदराबादमधील २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तेजस्विनीच्या मृत्यूप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. मंदिरात विवस्त्र अवस्थेत प्रवेश, देवीची मूर्ती आणि तलावातील शोधमोहीम यामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे.

Mayuri Gawade

हैदराबाद : २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तेजस्विनी हिच्या मृत्यूच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला ही आत्महत्येची घटना असल्याचे समोर आले होते. मात्र, तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातून बेपत्ता झालेली देवीची मूर्ती, महिन्याला जवळपास एक लाख रुपयांचे घरभाडे आणि संशयित मृत्यूपूर्व चिठ्ठी यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. मेडीपल्ली पोलीस या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत आहेत.

मध्यरात्री घरातून बाहेर पडली

रिपब्लिक वर्ल्डच्या वृत्तानुसार, पीरजादीगुडा परिसरातील शंकरनगर येथे ही घटना घडली. तेजस्विनी शुक्रवारी (दि. १७) आईसोबत नवीन घर पाहण्यासाठी गेली होती. घरी परतल्यानंतर दोघी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपल्या. त्यानंतर मध्यरात्री तिने आईच्या खोलीला बाहेरून कडी लावली आणि घराबाहेर पडली. रात्री साधारण दोनच्या सुमारास ती परिसरातील मंदिराच्या दिशेने गेली.

मंदिरातून देवीची मूर्ती घेऊन तलावाकडे धाव

मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेजस्विनी विवस्त्र अवस्थेत गर्भगृहात प्रवेश करताना दिसते. त्यानंतर तिने देवी अम्मावरूची मूर्ती उचलली आणि ती हातात घेऊन जवळील तलावाच्या दिशेने धावत गेली. काही क्षणांतच तिने तलावात उडी घेतल्याचे सीसीटीव्हीत दिसून येते.

मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेजस्विनी विवस्त्र अवस्थेत मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना दिसत असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. त्यानंतर तिने देवी अम्मावरूची मूर्ती उचलली आणि ती हातात घेऊन जवळील तलावाच्या दिशेने धावत गेल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. यानंतर तिने तलावात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मृतदेह सापडला; मात्र मूर्तीचा अद्याप शोध नाही

शनिवारी सकाळी डीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने तलावातून तेजस्विनीचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, मंदिरातून नेण्यात आलेली मूर्ती अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे डीआरएफचे विशेष पथक बोटी आणि गोताखोरांच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवत आहे. तपास यंत्रणेच्या दृष्टीने ही मूर्ती महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे.

महिन्याला जवळपास एक लाख रुपयांचे घरभाडे

तपासादरम्यान तेजस्विनीच्या आर्थिक व्यवहारांचीही माहिती समोर आली. ती राहत असलेल्या फ्लॅटसाठी दररोज सुमारे ३,५०० रुपये भाडे दिले जात होते. म्हणजेच, महिन्याला जवळपास एक लाख रुपयांचे भाडे भरले जात होते. याशिवाय, ती राहत असलेल्या इमारतीचे वरचे दोन मजले बेकायदेशीर व्यावसायिक लॉज म्हणून चालवले जात असल्याची बाबही समोर आली आहे. या राहणीमानाचा किंवा आर्थिक व्यवहारांचा तिच्यावर कोणता मानसिक किंवा इतर प्रकारचा ताण होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

संशयित चिठ्ठी, डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक तपास

या प्रकरणात एक संशयित मृत्यूपूर्व चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली असून ती हस्ताक्षर तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. तसेच मोबाईलमधील माहिती, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर फॉरेन्सिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.

नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी तेजस्विनीच्या आईची चौकशी केली असून तिच्या या टोकाच्या कृतीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानसिक स्थिती, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक अहवाल यांच्या आधारे तपास पुढे सुरू असून, सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतरच या प्रकरणाबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र

BEST Bus Accident : अपघातांची मालिका सुरूच! मानखुर्दमध्ये बसची डिव्हायडरला धडक, वाहतुकीवर परिणाम; एकाचा मृत्यू, Video

Mumbai : १०० CCTV, तांत्रिक तपास अन् चार दिवसांची शोधमोहीम; ९ वर्षीय रेवाला धडक देऊन फरार झालेला दुचाकीस्वार अखेर जेरबंद

Wardha : भरधाव आयशर ट्रकची कारला पाठीमागून जोरदार धडक; समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, Video