राष्ट्रीय

सिक्कीममध्ये तमांग यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

Swapnil S

गंगटोक : सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गंगटोकच्या पालजोर स्टेडियममध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्यासह ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

सिक्कीममध्ये विधानसभेच्या ३२ जागा असून, तमांग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) ३१ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. सिक्कीममध्ये सत्ताधारी ‘एसकेएम’ने सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एसडीएफ) सुपडा साफ केला. सिक्कीममध्ये २५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या ‘एसडीएफ’ला यावेळी फक्त एक जागा मिळाली. एसडीएफचे नेते व माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला, तर काँग्रेस-भाजपला एकही जागा मिळाली नाही.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस