राष्ट्रीय

भारताचा जन्मदर ५० वर्षांत आला निम्म्यावर

भारतातील जन्मदर आणि मृत्युदर यांच्या प्रमाणात गेल्या काही दशकांमध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येत असून ते ५० वर्षांपूर्वीच्या प्रमाणाच्या तब्बल निम्म्यापर्यंत घटले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील जन्मदर आणि मृत्युदर यांच्या प्रमाणात गेल्या काही दशकांमध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येत असून ते ५० वर्षांपूर्वीच्या प्रमाणाच्या तब्बल निम्म्यापर्यंत घटले आहेत.

स्वातंत्र्यापासून दर १० वर्षांनी देशात जनगणना होते. कोरोनामुळे २०२१ साली ही जनगणना होऊ शकली नाही. मात्र, २०२७ मध्ये या जनगणनेचे आकडे जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच जातीनिहाय गणनेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. पण या सगळ्यात भारताच्या लोकसंख्येबाबत गेल्या ५० वर्षांत जे घडले नाही, असे काही महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे दिसून येत आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले असून त्यात दोन महत्त्वाच्या निकषांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसंख्येची आकडेवारी केंद्र सरकारच्या २०२३ च्या आकडेवारीच्या आधारे हे दोन निकष ठरवण्यात आले आहेत. त्यात भारतातील जन्मदर आणि भारतातील मृत्युदर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय, अर्भक मृत्युदर, गर्भवती माता मृत्युदर या निकषांचीही आकडेवारी देण्यात आली आहे. यातील जन्मदर व मृत्युदर हे ५० वर्षांपूर्वीच्या प्रमाणाच्या तब्बल निम्म्यापर्यंत घटले आहेत.

भारतातील मृत्युदर

मृत्युदर म्हणजे दर १००० लोकांमागे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण असून २०१३ मध्ये भारतातील मृत्युदर ७ टक्क्यांच्या घरात होता. २०२३ मध्ये हेच प्रमाण ६.४ टक्के झाले. शहरी भागात ५.७ टक्के मृत्युदर असून ग्रामीण भागात तो जवळपास १ टक्क्यांनी जास्त म्हणजेच ६.८ टक्के इतका आहे. राज्यांमध्ये छत्तीसगडमध्ये सर्वाधिक ८.३ टक्केतर चंदीगडमध्ये सर्वात कमी ४ टक्के मृत्युदर आहे.

अर्भक मृत्युदर

अर्भक मृत्युदर म्हणजे जन्माला येणाऱ्या दर १००० अर्भकांमध्ये मृत्यू होणाऱ्या अर्भकांची संख्या असून गेल्या ५० वर्षांत यात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. अगदी गेल्या १० वर्षांचा विचार करता २०१३ साली अर्भक मृत्युदर ४० टक्के होता. तो २०२३ साली ३७.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ४४ टक्क्यांवरून घटून २८ टक्क्यांवर आले आहे, तर शहरी भागात हे प्रमाण २७ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आले आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ३७ टक्के अर्भक मृत्यूदर आहे, तर मणिपूरमध्ये सर्वात कमी म्हणजेच फक्त ३ टक्के इतका अर्भक मृत्युदर आहे.

माता मृत्युदर गेल्या काही दशकांत भारतात प्रसूतीदरम्यान मातांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात बरीच घट झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या आकडेवारीनुसार, १९९० ते २०२० या ३० वर्षांच्या काळात देशाचा माता मृत्युदर निम्म्यापर्यंत खाली आला आहे. १९९० सालच्या तुलनेत २०२० सालापर्यंत भारतातील माता मृत्यूंच्या प्रमाणात तब्बल ८३ टक्के घट झाली आहे. १९९० साली प्रत्येक १ लाख जन्मांमागे ५५६ मातांचे मृत्यू होत होते. हे प्रमाण आता ९७ पर्यंत खाली आले आहे.

भारतातील जन्मदर

जन्मदर म्हणजे प्रती १००० लोकसंख्येमागे होणारे जन्म असून सरकारी आकडेवारीनुसार, २०१३ साली भारताचा जन्मदर २१.४ टक्के होता. २०२३ मध्ये हे प्रमाण १८.४ टक्के होते. ५० वर्षांपूर्वी म्हणजे १९७१ साली भारतातील जन्मदर ३६.९ टक्के इतका प्रचंड होता. त्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील जन्मदर मोठ्या प्रमाणावर घटल्याचे हे निदर्शक आहे. शहरी व ग्रामीण भागाचा विचार करता शहरांमध्ये जन्मदर जास्त प्रमाणात घटल्याचे दिसून आले आहे. राज्यांचा विचार करता बिहारमध्ये सर्वाधिक २५.८ टक्के इतका जास्त जन्मदर असून अंदमान-निकोबारमध्ये सर्वात कमी १०.१ टक्के जन्मदर आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला