भारत-कतारमध्ये 'म्युझियम-इन-रेसिडन्स' शैक्षणिक भागीदारी Photo : X (@RIL_Updates)
राष्ट्रीय

भारत-कतारमध्ये 'म्युझियम-इन-रेसिडन्स' शैक्षणिक भागीदारी; कतार म्युझियम्स - नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर यांच्यात करार

कतार म्युझियम्सच्या अध्यक्षा, महामहिम शेखा अल मयासा बिंत हमद बिन खलिफा अल थानी आणि भारतातील मुंबईस्थित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ईशा अंबानी यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) आणि कतार म्युझियम्स (QM) यांच्यात पाच वर्षांची धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली.

Swapnil S

मुंबई : कतार म्युझियम्सच्या अध्यक्षा, महामहिम शेखा अल मयासा बिंत हमद बिन खलिफा अल थानी आणि भारतातील मुंबईस्थित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ईशा अंबानी यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) आणि कतार म्युझियम्स (QM) यांच्यात पाच वर्षांची धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. या सहकार्यांतर्गत भारत आणि कतार या दोन्ही देशांमध्ये ‘म्युझियम-इन-रेसिडन्स’ शैक्षणिक कार्यक्रमांची मालिका राबवली जाणार आहे. या कार्यक्रमांचा उद्देश मुलांसाठी खेळकर, संग्रहालय-आधारित शिक्षणाचा अनुभव देणे तसेच शिक्षकांना सर्जनशीलता वाढवण्यासाठी नवी साधने उपलब्ध करून देणे हा आहे.

हा करार सोहळा दोहामधील नॅशनल म्युझियम ऑफ कतार येथे पार पडला. सर्जनशीलता जागवण्यासाठी शिक्षणाची शक्ती आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व या समान विश्वासातून प्रेरित होऊन QM आणि NMACC एकत्रितपणे लहान वयोगटातील शिक्षण अधिक समृद्ध करणारे कार्यक्रम विकसित करत आहेत. हे उपक्रम जरी मुख्यतः बालशिक्षणावर केंद्रित असले, तरी ते शिक्षक आणि स्वयंसेवकांनाही नवी साधने, साहित्य आणि खेळकर पद्धती प्रदान करून वर्गखोलीत नवकल्पना राबवण्यास सक्षम करतात. QM आणि NMACC सर्जनशीलता, सहानुभूती आणि शोधाची भावना प्रोत्साहित करणारे अतिरिक्त उपक्रम विकसित करण्यासाठीही एकत्र काम करतील. हे कार्यक्रम भारतभरातील शाळा, अंगणवाड्या आणि समुदाय केंद्रांमध्ये, ग्रामीण तसेच वंचित भागांसह, राबवले जातील.

कतार म्युझियम्सच्या अध्यक्षा महामहिम शेखा अल मयासा बिंत हमद बिन खलिफा अल थानी म्हणाल्या, कतार म्युझियम्स आणि नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर यांचा विश्वास आहे की, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण ही आत्मविश्वासपूर्ण व संवेदनशील नव्या पिढीच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. भारतासोबतच्या आमच्या ‘ईयर ऑफ कल्चर’ या उपक्रमाच्या वारशाचा भाग म्हणून, ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखालील या सहकार्याद्वारे कतार म्युझियम्स आपले कौशल्य आणि अनुभव या केंद्राच्या आधीच समृद्ध आणि सातत्याने विस्तारत असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये योगदान देईल. यामुळे भारतभरातील वर्गखोल्यांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साधने आणि दृष्टिकोन उपलब्ध होतील.

भारतामध्ये, NMACC हे रिलायन्स फाउंडेशन (RF) सोबत भागीदारी करून हे कार्यक्रम विविध प्रदेशांमध्ये राबवेल. या उपक्रमांना कतार म्युझियम्समधील तज्ज्ञ - ज्यामध्ये दादू, चिल्ड्रन्स म्युझियम ऑफ कतार येथील तज्ज्ञांचाही समावेश असेल – मार्गदर्शन करतील. हे तज्ज्ञ मास्टरक्लासेस आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन देतील. भारतातील विविध शिक्षणपरिस्थितींनुसार प्रत्येक कार्यक्रम रूपांतरित केला जाईल, ज्यामुळे शिक्षण आणि कला क्षेत्रातील NMACCच्या व्यापक बांधिलकीला अधिक बळ मिळेल. दरम्यान, मुलांवर आणि शिक्षणावर केंद्रित असलेल्या या अर्थपूर्ण सहकार्याकरिता महामहिम शेखा अल मयासा बिंत हमद बिन खलिफा अल थानी आणि कतार म्युझियम्स यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आम्ही जागतिक कल्पना भारतात आणण्यासोबतच भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडण्यास आणि तरुणांसाठी जागतिक दर्जाचे शैक्षणिक अनुभव निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत, असे ईशा अंबानी यांनी सांगितले.

कतार म्युझियम्स आणि नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर दोघांचाही विश्वास आहे की संस्कृतीतून कल्पनाशक्ती जन्माला येते आणि शिक्षणातून क्षमतेला मूर्त रूप मिळते. या भागीदारीद्वारे आम्ही नव्या प्रकारच्या शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक मुलाला धाडसी स्वप्ने पाहण्याची आणि आत्मविश्वासाने शिकण्याची ताकद देणे आहे.
ईशा अंबानी, संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात