परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल  फोटो सौजन्य - एएनआय
राष्ट्रीय

आता चीनकडून कुरापती! अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न; भारताने खडसावले

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षात पाकिस्तान समर्थक भूमिका घेऊन तोंडावर आपटलेल्या चीनची खुमखुमी अद्यापही जिरलेली नाही. आता चीनने भारताचे अविभाज्य राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील जवळपास २७ ठिकाणांची नावे बदलण्याचा...

Swapnil S

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षात पाकिस्तान समर्थक भूमिका घेऊन तोंडावर आपटलेल्या चीनची खुमखुमी अद्यापही जिरलेली नाही. आता चीनने भारताचे अविभाज्य राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील जवळपास २७ ठिकाणांची नावे बदलण्याचा सपाटा लावला आहे. तथापि, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहणारच, असे भारताने चीनला बुधवारी स्पष्टपणे खडसावले आहे.

चीनने आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न सुरू केला असून भारताने या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, चीनची ही कृती अतिशय हास्यास्पद असल्याचे सांगतानाच अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणारच, असे भारताने ठणकावले आहे.

एकीकडे भारत पकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना, चीनसोबतही तणाव वाढताना दिसत आहे. चीन त्यांच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय राज्यांमध्ये सातत्याने कुरापती करीत आहे. चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने या कृतीचा तीव्र विरोध केला असून चीनची ही कृती अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, हे निर्विवाद सत्य कधीच बदलणार नाही, असे भारताने म्हटले आहे. दुसरीकडे, चीन बऱ्याच काळापासून अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा दावा करत आहे.

अरुणाचल प्रदेश आपलाच भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. अरुणाचल हा चीनचा एक भाग असल्याने तेथील लोकांना आपल्याच देशात येण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही, असे चीनचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीही चीनने अरुणाचल प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या ३० नवीन नावांची यादी प्रसिद्ध केली होती, जी नंतर भारताने नाकारली होती.

अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग हे सत्य चीन बदलू शकत नाही

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे की, आमच्या लक्षात आले आहे की, अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा व्यर्थ प्रयत्न चीन करत आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहणार आहे, हे सत्य चीन कधीच बदलू शकणार नाही.

Mumbai : मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; 'या' ठिकाणी मिळणार त्वरित मदत

Thane : पाणीटंचाई टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा आधार; उन्हाळ्यात कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या वापराचा निर्णय

लाडकी बहीण योजना : e-KYC मुदत वाढली, पण सर्वांसाठी नाही; फक्त 'या' महिलांनाच मिळणार संधी, संकेतस्थळावर दिला स्पष्ट संदेश

Mumbai : थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस...अन्यथा कायदेशीर कारवाई; डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा

ज्येष्ठांच्या पालनपोषणाचा कायदा म्हणजे मालमत्तेतून बेदखल करण्याचा पर्याय नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा