राष्ट्रीय

महागाईचा 'घाऊक' भडका; चलनवाढ १२.२९ टक्क्यांवर, ऑक्टोबरमध्ये नवीन उच्चांक

इंधन, वीज आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे चालू आर्थिक वर्षातील नवीन घाऊक मूल्य सूचकांक मालिकेनुसार ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर १२.२९ टक्क्यांच्या उच्चांकावर नोंदवला गेला. अर्थतज्ज्ञांच्या मते, जागतिक ऊर्जा दरामध्ये होत असलेली नरमाई नोव्हेंबरमधील घाऊक महागाईचा आकडा खाली आणण्यास मदत करू शकेल.

Swapnil S

नवी दिल्ली : इंधन, वीज आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे चालू आर्थिक वर्षातील नवीन घाऊक मूल्य सूचकांक मालिकेनुसार ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर १२.२९ टक्क्यांच्या उच्चांकावर नोंदवला गेला. अर्थतज्ज्ञांच्या मते, जागतिक ऊर्जा दरामध्ये होत असलेली नरमाई नोव्हेंबरमधील घाऊक महागाईचा आकडा खाली आणण्यास मदत करू शकेल. यापूर्वी सप्टेंबर २०२६ मध्ये घाऊक महागाईचा दर ११.३९ टक्के होता.

ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्याचा महागाई दर ८.२६ टक्के राहिला, जो मागील महिन्यात ८.१४ टक्के होता. बिगर-खाद्य वस्तूंच्या बाबतीत गेल्या महिन्यात महागाई ११.६९ टक्के नोंदवली गेली, जी सप्टेंबरमध्ये १०.२८ टक्के होती.

खनिजांच्या बाबतीत दरवाढीचा वेग १२.६४ टक्के राहिला, जो सप्टेंबरमधील ९.५१ टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे. एकंदरीत प्राथमिक वस्तूंच्या बास्केटमध्ये ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई ९.२४ टक्के नोंदवली गेली, जी मागील महिन्यात ८.६७ टक्के होती.

इंधन आणि विजेचा महागाई दर ऑक्टोबरमध्ये वाढून ३२.८४ टक्क्यांवर पोहोचला, जो मागील महिन्यात २५.८५ टक्के होता. उत्पादित वस्तूंच्या बाबतीत महागाई ९.५४ टक्के राहिली, जी यापूर्वी ९.७६ टक्के होती. खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, वीज, अन्नधान्य, मूळ धातू निर्मिती, रसायने आणि रासायनिक उत्पादने, अन्नपदार्थ निर्मिती आणि अखाद्य वस्तू या गटांच्या वाढलेल्या किमतींमुळे ऑक्टोबरची महागाई वाढली. याशिवाय, वस्त्रोद्योग आणि रबर व प्लास्टिक उत्पादनांच्या उत्पादनामुळेही ऑक्टोबरमधील घाऊक महागाई वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

सरकारने १५ जून रोजी २०२२-२३ हे नवीन पायाभूत वर्ष असलेली सुधारित घाऊक महागाई निर्देशांकाची मालिका जारी केली आहे.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ६.०९ टक्के नोंदवली गेली. ती दोन वर्षांत प्रथमच रिझर्व्ह बँकेच्या उच्च सहिष्णुता मर्यादेचे उल्लंघन करणारी ठरली. त्यामुळे दोन ते चार डिसेंबर रोजी होणाऱ्या मौद्रिक धोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच घाऊक महागाई वाढत्या मार्गावर आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीची झालेली नाकेबंदी यामुळे जागतिक कच्चे तेल आणि खतांचे खर्च वाढले. याचा परिणाम अन्नधान्य आणि कमोडिटीच्या किमतींवर झाला. भारतामध्ये बहुतांश कच्चे तेल याच मार्गाने आयात केले जाते.

रिसर्जंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ज्योती प्रकाश गाडिया म्हणाले की, भविष्यात आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी आणि आर्थिक गतिशीलता टिकवून ठेवण्यासाठी पुरवठा साखळीचे प्रभावी व्यवस्थापन आणि किंमत स्थैर्याचे धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

डिसेंबरच्या पतधोरणात व्याज दरवाढ अटळ

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ६.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत प्रथमच ती रिझर्व्ह बँकेच्या उच्च सहिष्णुतेच्या मर्यादेबाहेर गेली आहे. यामुळे २ ते ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मौद्रिक धोरण आढावा बैठकीत आरबीआय धोरणात्मक दरवाढ होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच घाऊक किंमत निर्देशांक सतत वाढत्या मार्गावर आहे. पश्चिम आशियातील युद्ध आणि भारतामध्ये कच्च्या तेलाची आयात ज्या 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून होते ती नाकेबंदी झाल्यामुळे जागतिक स्तरावर कच्चे तेल आणि खतांचे दर वाढले. याचा परिणाम अन्नधान्य आणि वस्तूंच्या किमतींवर झाला आहे.

  • खाद्य वस्तूंची महागाई : ऑक्टोबरमध्ये ८.२६ टक्के (सप्टेंबरमधील ८.१४ टक्क्यांवरून वाढ)

  • बिगर-खाद्य वस्तूंची महागाई : ऑक्टोबरमध्ये ११.६९ टक्के (सप्टेंबरमधील १०.२८ टक्क्यांवरून वाढ)

  • खनिज : भाववाढीचा दर १२.६४ टक्के (सप्टेंबरमधील ९.५१ टक्क्यांवरून वाढ)

  • प्राथमिक वस्तू : ऑक्टोबरमध्ये ९.२४ टक्के (सप्टेंबरमधील ८.६७ टक्क्यांवरून वाढ)

  • इंधन आणि वीज : ऑक्टोबरमध्ये वाढून ३२.८४ टक्के (सप्टेंबरमधील २५.८५ टक्क्यांवरून वाढ)

  • उत्पादित वस्तू : ऑक्टोबरमध्ये ९.५४ टक्के (सप्टेंबरमधील ९.७६ टक्क्यांवरून घट)

महागाईत भर घालणाऱ्या वस्तू

  • खनिज तेले (पेट्रोलियम उत्पादनांसह)

  • कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

  • वीज आणि खाद्य वस्तू

  • मूळ धातू निर्मिती, रसायने आणि रासायनिक उत्पादने

  • अन्न प्रक्रिया उत्पादने आणि बिगर-खाद्य वस्तू

  • वस्त्रोद्योग तसेच रबर आणि प्लास्टिक उत्पादने

बेस इफेक्ट आणि प्राथमिक वस्तू तसेच इंधन आणि वीज गटांमधील सर्वसमावेशक वाढीमुळे ऑक्टोबर २०२६ मधील घाऊक महागाई नवीन मालिकेतील सर्वाधिक ठरली आहे. पश्चिम आशियातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष इंधन आणि वीज महागाईला वर ढकलत आहे आणि हा प्रश्न सुटेपर्यंत ती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या उर्वरित काळात चलन मजबुतीकरण आणि कच्च्या तेलाच्या दरातील नरमाई घाऊक महागाई चालू महिन्यात ११.५ टक्क्यांवर खाली आणू शकते.
देवेंद्र पंत, मुख्य अर्थतज्ज्ञ, इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च

बार्कलेजने म्हटले आहे की, ऑगस्टपासून घाऊक महागाईत वाढ झाली असून ती दुहेरी अंकात सुरू आहे. परंतु घाऊक किमती किरकोळ बाजारात पोहोचण्याचे प्रमाण कोअर वस्तूंसाठी मध्यम स्वरूपाचे आहे. ऑक्टोबरच्या उच्चांकाच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जागतिक ऊर्जा दर घसरल्यामुळे आगामी महिन्यांमध्ये घाऊक महागाईचा वेग मंदावू शकतो.

नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ब्रेंट क्रूड प्रति बॅरल २० डॉलरने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हा ट्रेंड कायम राहिल्यास सण-समारंभाच्या काळानंतर घाऊक महागाईचा ताण कमी होईल आणि इनपूट व वाहतूक खर्च कमी होऊन किरकोळ महागाईवरही नियंत्रण येईल. रिझर्व्ह बँकेच्या चार टक्के लक्षापेक्षा ती वर्षभर वर राहण्याची शक्यता असली तरी आर्थिक वर्ष २०२७ च्या तिसऱ्या त्रमासकात किरकोळ महागाई सहा टक्क्यांवर उच्चांक गाठून नंतर ओसरेल अशी अपेक्षा आहे. आणखी ०.२५ पॉइंट्सची रेपो दर वाढ ५.७५ टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता असून त्यानंतर दर स्थिर ठेवली जाण्याची शक्यता ऑक्टोबरच्या घाऊक महागाईच्या आकडेवारीवरून बळकट होत आहे.
प्रांजल घाटे, अर्थतज्ज्ञ, ब्रिकवर्क रेटिंग्ज

रिसर्जंट इंडियाचे व्यवस्था प्रबंध संचालक ज्योती प्रकाश गाडिया यांनी सांगितले की, आर्थिक गतिशीलता टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात प्रभावी पुरवठा बाजूचे व्यवस्थापन, मूल्य स्थिरता राखणारे न्याय्य मौद्रिक धोरण महत्त्वाचे ठरेल. सरकारने १५ जून रोजी २०२२ ते २०२३ हे नवीन मूळ वर्ष असलेली सुधारित घाऊक मूल्य सूचकांक मालिका जाहीर केली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत मलेरियाचा उद्रेक; नऊ महिन्यांत साडेबारा हजार जणांना लागण; हिवतापमुक्त शहराचे आव्हान कायम

लातूर जिल्हा बँकेवर देशमुख घराण्याचा झेंडा; धीरज देशमुखांच्या पॅनेलने जिंकल्या १४ जागा

Mumbai : नॉन-सेस इमारतींनाही इन्सेंटिव्ह FSI; मिश्र पुनर्विकास प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय

अजित पवार यांची कार्यपद्धती थक्क करणारी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

Ajit Pawar Death: विमान अपघात चौकशी अहवाल लवकर प्रसिद्ध करा - मुख्यमंत्री