भारतीय विमान कंपन्यांना ३८ हजार कोटींचा तोटा होणार; यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 'इक्रा'चा अंदाज  प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

भारतीय विमान कंपन्यांना ३८ हजार कोटींचा तोटा होणार; यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 'इक्रा'चा अंदाज

भारताचे विमान क्षेत्र सध्या तीव्र आर्थिक दबाव आणि अस्थिरतेच्या काळातून जात आहे. येत्या वर्षभरात विमान कंपन्यांना ३६ ते ३८ हजार कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो, असा अंदाज पतमान संस्था ‘इक्रा’ने वर्तवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे विमान क्षेत्र सध्या तीव्र आर्थिक दबाव आणि अस्थिरतेच्या काळातून जात आहे. येत्या वर्षभरात विमान कंपन्यांना ३६ ते ३८ हजार कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो, असा अंदाज पतमान संस्था ‘इक्रा’ने वर्तवला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, महागडे जेट इंधन आणि पश्चिम आशियातील संकटामुळे या उद्योगाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ‘इक्रा’च्या मते, चांगल्या प्रवासी संख्येच्या जोरावर २०२६-२७ मध्ये विमान कंपन्यांचा तोटा कमी होऊन ११-१२ हजार कोटी रुपयांवर येईल, परंतु आता परिस्थिती बदलली आहे.

पश्चिम आशियातील संकटामुळे विमान क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या वादामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांचा खर्च आणि तिकीट दरांवर झाला आहे. तिकीट दर वाढल्यामुळे आणि महागाईमुळे लोकांनी अनावश्यक खर्चात कपात केली आहे, ज्याचा फटका हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवरही स्पष्टपणे दिसत आहे.

तोट्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • रुपयातील घसरण: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात परकीय चलन नुकसान सोसावे लागत आहे.

  • लीज रेंटलचा वाढता बोजा: विमान कंपन्यांना नवीन विमानांचा पुरवठा सतत मिळत आहे. ज्यामुळे त्यांचे भाडे वाढले आहे.

  • खर्च आणि भाड्यातील असंतुलन: कंपन्यांचा परिचालन खर्च वेगाने वाढला आहे, परंतु त्या या महागाईचा संपूर्ण भार विमान भाडे वाढवून प्रवाशांवर टाकू शकत नाहीत. याआधी, गेल्या आर्थिक वर्षातही भारतीय विमान उद्योगाचा एकूण तोटा अंदाजित १७-१८ हजार कोटी पेक्षा ३२ ते ३४ हजार कोटी रुपये होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Ratnagiri : रघुवीर घाटात दरड कोसळली; एसटी बस घाटातच अडकली, १५ ते २० गावांचा संपर्क तुटला, Video

Mumbai : सप्टेंबर अखेरपर्यंत सायन पूल खुला करण्याचे नियोजन; पुलाच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डनचा पर्याय - महापौर रितू तावडे

IAS Officer Transfer : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या