भारतीय लष्कराचे संग्रहित छायाचित्र पीटीआय
राष्ट्रीय

भारतीय लष्कराचे ड्रोन तांत्रिक बिघाडाने पाकिस्तानात

भारतीय लष्कराने तातडीने हॉटलाईनवरून पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे ड्रोन परत मागवले. मात्र...

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे ड्रोन तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानी हद्दीत जाऊन पडला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कराने हे ड्रोन ताब्यात घेतले आहे. भारतीय लष्कराने तातडीने हॉटलाईनवरून पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे ड्रोन परत मागवले. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिले, याची माहिती कळू शकली नाही. शुक्रवारी सकाळी ९.२५ वाजता प्रशिक्षणासाठी भारतीय लष्कराने ड्रोन उडवले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे हे ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीतील निकीईल भागात पडले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास