(Photo-X)
राष्ट्रीय

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय कॅप्टनचे निधन; मृतदेहासाठी कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

मर्चेंट नेव्हीचे अनुभवी जहाज कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Swapnil S

रांची : मर्चेंट नेव्हीचे अनुभवी जहाज कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राकेश रंजन सिंह हे 'अवाना' या जहाजावर कार्यरत होते, जे पश्चिम आशियातील इराण-इस्रायल तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकले होते.

राकेश रंजन सिंह हे २ फेब्रुवारी रोजी रांचीहून दुबईसाठी निघाले होते. सुट्टी संपल्यानंतर ते 'अवाना' जहाजावर रुजू झाले होते. इंधन भरण्यासाठी जहाजाने होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे प्रवास केला. इंधन भरल्यानंतर, ते १ मार्च रोजी भारताकडे रवाना झाले. मात्र, प्रदेशातील वाढता तणाव आणि युद्धामुळे जहाजाला समुद्रातच थांबवून ठेवण्यात आले. हे जहाज दुबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर अंदाजे १८ ते २० दिवस थांबले होते.

प्रकृती अचानक खालावली

राकेश रंजन सिंह यांच्या व्यतिरिक्त जहाजावर जवळपास ३५ इतर कर्मचारी आहेत. दीर्घकाळच्या सागरी प्रवासामुळे आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे १८ मार्चला सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून जहाजावरील अधिकाऱ्यांनी दुबई एटीसीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली. मात्र, त्या भागात सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांना जहाजावरून बोटीने दुबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाला.

हृदयविकाराचा झटका

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सध्या दुबईतील शेख रशीद रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

World Water Day 2026 : मुंबईकरांना लाखो लिटर पाणी लागणार; १५ वर्षात आणखी ३ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज

राजकारणातील भोंदू भक्तांवरही कारवाई करा! उद्धव ठाकरे यांची मागणी

Mumbai : सफाई कामगारांचा उद्या 'वर्षा'वर मोर्चा! मालकी हक्काच्या घरांसाठी आक्रमक

निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होणार - राहुल गांधी

Mumbai : अखेर १५० कोटींचे रस्ते मार्किंग टेंडर रद्द; संभाव्य घोटाळ्याच्या आरोपानंतर पालिकेची माघार