प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

सामानाच्या वजनाची मर्यादा ओलांडल्यास आता रेल्वेही शुल्क आकारणार

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता विमानाप्रमाणेच मर्यादित वजनापेक्षा अधिकचे साहित्य नेल्यास त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आता विमानाप्रमाणेच मर्यादित वजनापेक्षा अधिकचे साहित्य नेल्यास त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

विमान प्रवास करण्यापूर्वी तुम्ही नेत असलेल्या साहित्याचे वजन तपासले जाते. मर्यादेपक्षा जास्त वजन असल्यास त्यावर वाढीव शुल्क आकारले जाते. परंतु आता रेल्वेने प्रवास करतानाही ही काळजी घ्यावी लागणार आहे. खासदार वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. ज्यात विमान प्रवासासारखे रेल्वे प्रवास करतानाही प्रवाशांसाठी बॅगच्या वजनाचा नियम लागू केला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, सध्या विविध श्रेणीनुसार प्रवाशांकडून ट्रेनमधून घेऊन जाणाऱ्या साहित्यावर कमाल वजन निश्चित केले आहे. प्रत्येक श्रेणीत मोफत सामान आणि कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ३५ किलोपर्यंत सामान मोफत नेता येईल. त्यानंतर ७० किलोपर्यंत सामानावर शुल्क आकारले जातील. स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी ४० किलो मोफत सामान नेण्याची परवानगी आहे. त्यावर ८० किलोपर्यंत सामानावर शुल्क आकारले जाणार आहे.

एसी थ्री टियर आणि चेअर कारच्या प्रवाशांसाठी ४० किलोपर्यंत सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. फर्स्ट क्लास आणि एसी टू टियरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० किलोपर्यंत सामान नेता येईल. त्यांना १०० किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. अतिरिक्त सामानावर शुल्क आकारले जाणार आहे. मोफत मर्यादेपेक्षा अधिकचे सामान कोचमधून घेऊन जात असाल तर त्यासाठी निर्धारित दरापेक्षा दीड पट जास्त शुल्क भरावे लागेल असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रवाशांना डब्यांमध्ये वैयक्तिक सामान म्हणून १०० सेमी x ६० सेमी x २५ सेमी (लांबी x रुंदी x उंची) पर्यंतच्या ट्रंक, सुटकेस आणि बॉक्स नेण्याची परवानगी आहे. यापैकी कोणत्याही आकारापेक्षा जास्त सामान कोचमध्ये ठेवण्याची परवानगी नाही, असेही वैष्णव यांनी सांगितले.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...