संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या कामकाजात सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या कामकाजात सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

नवीन फ्लाइट ड्युटी टाइम नियम आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण होऊन लाखो प्रवासी अडकले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, जोपर्यंत त्यांचे कर्मचारी आणि कामकाज स्थिर होत नाही, तोपर्यंत त्यांनी कपात केलेल्या वेळापत्रकानुसारच काम करावे. कपात करण्यात येणाऱ्या उड्डाणांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

उड्डाणांमध्ये वाढीचे आदेश

इंडिगोमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ‘डीजीसीए’ने एअर इंडिया, अकासा एअर आणि स्पाइसजेटसारख्या विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले. एअर इंडियाने अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी देशांतर्गत मार्गांवर वाइड-बॉडी विमाने तैनात करण्यास सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गैरसोयीच्या काळात खासगी विमान कंपन्यांकडून होणारी भाड्याची लूट थांबवण्यासाठी ‘डीजीसीए’ने भाडे नियंत्रण लागू केले आहे. ५०० किमीपर्यंतच्या तिकिटांची किंमत जास्तीत जास्त ७,५०० रुपये आणि १,००० ते १,५०० किमीपर्यंतच्या अंतरासाठी तिकीटांची किंमत १५,००० रुपये असू शकते.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Ratnagiri : रघुवीर घाटात दरड कोसळली; एसटी बस घाटातच अडकली, १५ ते २० गावांचा संपर्क तुटला, Video

Mumbai : सप्टेंबर अखेरपर्यंत सायन पूल खुला करण्याचे नियोजन; पुलाच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डनचा पर्याय - महापौर रितू तावडे

IAS Officer Transfer : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या