ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक Photo : X
राष्ट्रीय

ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक

राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा ‘आयसिस’चा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला असून ‘आयसिस’च्या दोन संशयितांना अटक केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा ‘आयसिस’चा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला असून ‘आयसिस’च्या दोन संशयितांना अटक केली आहे. यातील एक दिल्लीचा, तर दुसरा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्लीतील सादिक नगर आणि भोपाळमध्ये यासंबंधित एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दिल्लीतील अदनान आणि भोपाळमधील एका संशयिताला अटक केली.

आरोपींची कसून चौकशी

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून दिल्लीत मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. त्यांच्या ताब्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. ‘आयसिस’चे नेटवर्क आणि त्यांच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त