राष्ट्रीय

सुर्याच्या अभ्यासासाठी इस्रो करणार 'आदित्या L1' लाँच ; ट्विट करत दिली तारीख आणि वेळेची माहिती

नवशक्ती Web Desk

चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (Indian Space Research Organisation) आत्मविश्वास बळावला आहे. आता इस्रोने एका नव्या मिशनची घोषणा केली आहे. इस्रोने आज (२८ ऑगस्ट) सुर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्या L1' या मिशनची घोषणा केली आहे. हे यान आवकाशात कधी झेपावणार याबाबतची वेळ आणि तारीख देखील इस्रोने शेअर केली आहे.

आदित्या एल१ हे यान सुर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात झेपावणार आहे. २ सप्टेंबर रोजी इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील तळावरुन ११. ५० वाजता हे यान अवकाशात झेपावणार आहे. 'आदित्या L1' हे यान सुर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारीत भारतीय वेधशाळा २ सप्टेंबर २०२३ रोजी इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील तळावरुन ११:५० वाजता झेपावणार आहे, असं ट्विट इस्रोकडून करण्यात आलं आहे. चांद्रयान-३ च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसात इस्रोने या नव्या मिशनची घोषणा केली आहे.

'आदित्या L1' अवकाशात झेपावताना पाहता येणार

'आदित्या L1' या मिशनच्या लाँचिंग सोहळा पाहण्यासाजी जे लोक इच्छुक असतील त्यांना तो पाहता येणार आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा तळावरील व्ह्यु गॅलरीमधून 'आदित्या L1'ला अवकाश झेप घेताना पाहता येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षिदार होण्यासाठी इच्छुकांनी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp. या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

'चंद्रायान-३' चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. जगाला अशक्य वाटणारं हे मिशन भारताच्या शास्त्रज्ञांनी यशस्वी करुन दाखवलं आहे. तसंच चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?

LICची 'एक नंबर' स्कीम; छोटी रक्कम गुंतवून मिळेल लाखोंचा फायदा