PM
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर पोलिसांचे श्रीनगरमध्ये छापे; कोट्यवधींच्या गुंतवणुकीतून फसवणूक

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सायबर शाखेने मंगळवारी रात्री हे छापे मारले. आता या प्रकरणी तपास सुरू केला असून यातील फसवणूक केलेली रक्कमही वाढण्याची शक्यता आहे.

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील पाच ठिकाणी छापे टाकले. छाप्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीच्या चौकशीसंबंधात हे छापे टाकण्यात आले. 'फिर हेरा फेरी' या हिंदी चित्रपटापासून प्रेरित होऊन, फसवणूक करणाऱ्यांनी करण नगर परिसरात 'क्युरेटिव्ह सर्व्हे' नावाची कंपनी स्थापन केली आणि दोन आठवड्यांत गुंतवणूक दुप्पट करण्याच्या बहाण्याने अनेकांना किमान ५९ कोटी रुपयांची फसवणूक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सायबर शाखेने मंगळवारी रात्री हे छापे मारले. आता या प्रकरणी तपास सुरू केला असून यातील फसवणूक केलेली रक्कमही वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने सुरुवातीला दिलेले वचन पूर्ण केले आणि अधिक गुंतवणूकदार त्यामुळे आले मात्र नंतर लोकप्रियता वाढल्यानंतर कंपनीचे मालक गायब झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना करण नगर कार्यालयाला कुलूप लावलेले होते. यूट्यूबर्सपैकी इद्रिस मीर याने सांगितले की, आपल्याला या संबंधात फसवणुकीसाठी जबाबदार धरता येणार नाही. त्याने त्याच्या चॅनेलवर सशुल्क जाहिरात केली होती.  माझ्यासारखे अन्यही असे लोक आहेत.  ही कंपनी जवळपास एक वर्षापासून कार्यरत होती. जम्मू, श्रीनगर, पॅटन आणि संग्रामा येथे कंपनीच्या शाखा होत्या, मग तितके दिवस काय चालले होते, असाही सवाल या यूट्यूबर्सने केला.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री

नंदूरबारमध्ये मोर्चाला हिंसक वळण; गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार

कांदिवलीत गॅस गळतीमुळे भीषण आग; सात जण जखमी

जहाजबांधणी, सागरी उद्योगांसाठी ७० हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर; राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय