राष्ट्रीय

कबड्डीपटूंना स्वच्छतागृहात जेवण, व्हायरल व्हिडीओमुळे सत्य आले समोर

अधिकारी अनिमेश सक्सेना यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला

वृत्तसंस्था

एकीकडे खेळाडू पंचतारांकित हॉटेलमध्ये तर दुसरीकडे क्रीडापटूंची दुरवस्था पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेट सोबतच इतर खेळाडूही उच्च दर्जाचे आहेत. पण लखनौमधील सहारनपूरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ देशभरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कबड्डीपटूंना स्वच्छतागृहात जेवण देण्यात आले आहे. ही बाब समोर आल्यानंतर क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अधिकारी अनिमेश सक्सेना यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. तसेच पावसामुळे जलतरण तलावाजवळ खाद्यपदार्थ ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांवर टीका केली आहे. एकाच वेळी अनेक खेळाडू असल्याने सर्व खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था मैदानात करण्यात आली होती. मात्र शौचालयात हे अन्न कोणी ठेवले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल