कर्नाटक मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष ब्रेकफास्ट बैठकीनंतर संपल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी अद्यापही धुसफूस सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष ब्रेकफास्ट बैठकीनंतर संपल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी अद्यापही धुसफूस सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि स्वत: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकत्र चर्चा करून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना परिस्थितीची माहिती करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सोनिया कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही चर्चा सुमारे ४३ मिनिटे चालली, त्यादरम्यान एआयसीसी अध्यक्ष, आमदार आणि मंत्र्यांनी राहुल गांधींना घडामोडींचे एकूण चित्र सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी सोनिया गांधींशी बोलून पुढील निर्णय घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. पुढील दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिल्लीला बोलाविण्यात येणार आहे.

Mumbai : खार येथील जान्हवी कुकरेजाच्या आईची उच्च न्यायालयात धाव; मैत्रीण दिया पडळकरच्या निर्दोष सुटकेला आव्हान

मुंबईत सर्वसामान्यांसाठी २ हजार ६४० घरे; आजपासून म्हाडाचा अर्ज भरता येणार

मुंबई एअरपोर्टवर १० रुपयांत चहा; राघव चड्ढांचा उडान यात्री कॅफेतील अनुभव चर्चेत, पाहा Video

Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

सायबर फसवणुकीवर लगाम; RBIकडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल, १ एप्रिलपासून नवे सुरक्षा नियम लागू