राष्ट्रीय

नुपूर शर्मांचा शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीला घर देणार,अजमेर दर्गाच्या खादिमांचे वक्तव्य

दर्ग्याचे खादीम सलमान चिश्ती यांनी हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे

वृत्तसंस्था

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातून त्यांचा विरोध करण्यात येत आहे. भारतातही याप्रकरणी गदारोळ अद्याप सुरूच आहे. त्यातच राजस्थानमधील अजमेर दर्गाच्या एका खादिमांनी ‘नुपूर शर्मांचा शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीला मी माझे घर देणार’, असे खळबळजनक विधान केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.

दर्ग्याचे खादीम सलमान चिश्ती यांनी हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे. याप्रकरणी अजमेर शहरातील अलवर गेट पोलीस ठाण्यात सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खादीम सलमान चिश्ती यांनी दारूच्या नशेत हा व्हिडिओ बनवला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुमारे दोन मिनिटे ५० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सलमान चिश्तींनी नुपूर शर्मांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर सलमान चिश्ती फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले