पीटीआय
राष्ट्रीय

Kishtwar cloudburst : ढगफुटीतील मृतांचा आकडा ६५ वर

जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील ढगफुटीग्रस्त गावात शुक्रवारी बचाव पथकांनी शोध मोहीम तीव्र केली असून या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा ६५ वर गेल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जाहीर केले. या नैसर्गिक आपत्तीत आणखी नागरिक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Swapnil S

किश्तवार : जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील ढगफुटीग्रस्त गावात शुक्रवारी बचाव पथकांनी शोध मोहीम तीव्र केली असून या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा ६५ वर गेल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जाहीर केले. या नैसर्गिक आपत्तीत आणखी नागरिक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

गुरुवारी दुपारी चशोटी गावात ही दुर्घटना घडली. आतापर्यंत ६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ज्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन जवानांचाही समावेश आहे. १६७ जण जखमी असून ६९ जण बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. ३० मृतदेहांची ओळख पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

वार्षिक मचैल माता यात्रा चालू असताना ही दुर्घटना घडली. यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता बाजार, लंगर आणि सुरक्षा चौकी ढगफुटीच्या पाण्यात वाहून गेली. १६ घरे, शासकीय इमारती, तीन मंदिरे, चार पाणचक्क्या, ३० मीटरचा पूल आणि डझनभर वाहने यांचे यात नुकसान झाले.

शुक्रवारी सकाळी बचाव मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. पोलिस, लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवक बेपत्तांचा शोध घेत होते. सकाळी पाऊस थांबल्याने गती वाढली, मात्र मलब्याखाली अडकलेले कुणी जिवंत सापडण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवरील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात किमान ६० मृत्यू व शंभराहून अधिक जखमी झाल्याचे सांगितले.

जिल्हा प्रशासनाने मशीनद्वारे मोठे दगड, उपटलेली झाडे, वीज खांब हटवण्याचे काम सुरू केले. एनडीआरएफचे विशेष उपकरणांसह पथक शुक्रवारी सकाळी पोहोचले. जम्मू विभागीय आयुक्त रमेश कुमार, पोलिस आयुक्त भीम सेन तुती यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.

मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे उड्डाण करू शकले नाहीत, त्यामुळे एनडीआरएफचे पथक उधमपूरहून रस्त्याने आले. आणखी दोन पथके रस्त्याने येत आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांची देवाणघेवाण व्हॉट्सअ‍ॅप गटाद्वारे करण्यात आली. पडेर येथे नियंत्रण कक्ष व मदत केंद्र उभारले असून पाच अधिकारी तैनात आहेत.

लष्कराचे ३०० जवान, वैद्यकीय पथकांसह, पोलिस, एसडीआरएफ आणि इतर नागरी संस्थांबरोबर समन्वयाने काम करत आहेत. ६५ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले