भारतात होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात दाखल होत आहेत. ९ आणि १० सप्टेंबर रोजी ही परिषद होणार आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आज सकाळपासून दिल्लीच्या विमानतळावर दाखल व्हायला सुरुवात केली आहे. या परिषदेसाठी येणाऱ्या प्रत्येक नेत्याचं स्वागत भारतीय मंत्र्यांकडून केलं जात आहे.
मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कार्यालयाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जागतिक नेत्यांच्या स्वागताची एक झलक दाखवण्यात आली आहे. जवळजवळ ५०० नेते जी-२० शिखर परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत. व्हिडिओमध्ये काही नेत्यांच्या स्वागताचे चित्रण देखील दाखवण्यात आलं आहे.
जी 20 शिखर परिषदेसाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील दिल्लीत आले आहेत. ऋषी सुनक यांचं केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते स्वागत केलं गेलं. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे दुपारी दिल्लीत दाखल झाल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
जी 20 शिखर परिषदेसाठी भारतात आतापर्यंत दाखल झालेले नेते
- अर्जेंटियाचे अध्यक्ष अल्बर्ट फर्नाडझ
- आफिक्रन संघाचे प्रमुख अझली असायुमानी
- युरोपीयन युनियनच्या अध्यक्ष व्रुसुला वोन डेर लायेन
- आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा
- इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलेनी
- युरोपियन कॉन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिचेल
- डब्लूटीओ कार्यकारी प्रमुख नगोझी ओकनजो-इवेला
- मॅक्सिकोच्या अर्थमंत्री रकेल बुईनरोस्ट्रो सानजेझ
- ओईसीडी प्रमुख सचिव मॅथिस कोरमन