राष्ट्रीय

मृत्यूनंतर तिघांना जीवदान ; मुंबईतील यावर्षीचे २१ वे अवयवदान

२२ वर्षीय तरुणाचा अपघात झाल्याने तेथील जमलेल्या नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला

नवशक्ती Web Desk

अपघात झाल्यानंतर २२ वर्षीय युवकाला तातडीने नवी मुंबई अपोलो रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उपचारानंतर मेंदू मृत घोषित करण्यात आले. मृत्यूनंतर या तरुणाचे अवयव दान करण्यात आले. त्यामुळे तिघांना जीवदान मिळाले.

२२ वर्षीय तरुणाचा अपघात झाल्याने तेथील जमलेल्या नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. जवळ असलेल्या अपोलो रुग्णालयात दाखल केल्यावर जबर जखमी झालेल्या या मुलावर डॉक्टरांनी तपासण्या करून तातडीने उपचार सुरू केले. उपचारादरम्यान या मुलाला डॉक्टरांकडून मेंदू मृत ठरवण्यात आले. त्यांनंतर घरच्यांना अवयव दानाचे पटवून दिल्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. २४ जून रोजी यकृत आणि २ मूत्रपिंडांचे दान करण्यात आले. त्यामुळे तिघांना जीवदान मिळाले असल्याची माहिती झेडटिसी मुंबईची प्रशासकीय अधिकारी आणि प्रत्यारोपण समन्वयक संगीता देसाई यांनी दिली. तर मुंबईतील २०२३ सालातील २१ वे अवयवदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी