राष्ट्रीय

लोकसभेचं बिगुल वाजलं: देशात 7 आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान, 4 जूनला निकाल; आचारसंहिताही झाली लागू

अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Swapnil S

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (शनिवार) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासोबतच आचारसंहिताही लागू झाली आहे. 2019 प्रमाणेच यंदाही देशभरात सात टप्प्यांत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल, तर 1 जून रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान होईल. 4 जून रोजी मतगणना होईल आणि निकाल लागेल. लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. याशिवाय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान

पहिला टप्पा - 19 एप्रिल

दुसरा टप्पा - 26 एप्रिल

तिसरा टप्पा - 7 मे

चौथा टप्पा - 13 मे

पाचवा टप्पा - 20 मे

सहावा टप्पा - 25 मे

सातवा टप्पा - 1 जून

मतगणना - 4 जून

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान

  • पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी नागपूर, चंद्रपूर, रामटेक गडचिरोली, भंडारा-गोंदिया येथे मतदान होईल.

  • दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मतदान पार पडेल.

  • तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बारामती, उस्मानाबाद, रायगड, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली येथे मतदान होईल.

  • चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, मावळ, पुणे, शिरुर, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना येथे मतदान.

  • पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक, धुळे, दिंडोरी, भिवंडी, कल्याण, पालघर, ठाणे, मुंबई येथे मतदान.

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार