PTI Photo, Screenshot Via Sansad TV
राष्ट्रीय

लोकसभा निवडणूक निकालाने देशातील जातीय राजकारणाचा अंत - अखिलेश

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीने देशातील जातीय राजकारणाचा अंत झाला असून इंडिया आघाडीचा नैतिक विजय झाला आहे, असे सपाचे नेते अखिलेश यादव यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर केलेल्या भाषणात ते म्हणाले की, ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तो भारतासाठी जातीय राजकारणापासूनच्या स्वातंत्र्याचा दिवस होता. अयोध्येत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला ते मतदारांचे शहाणपण होते. इंडिया आघाडी ही भारत समर्थक असल्याचे संपूर्ण देशाला कळले, ही निवडणूक इंडिया आघाडीचा नैतिक विजय आहे, सकारात्मक राजकारणाचा हा विजय आहे, असेही ते म्हणाले.

...तरीही ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही - अखिलेश

दरम्यान, उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व म्हणजे ८० जागा सपाने जिंकल्या तरी आपण ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ईव्हीएम रद्द केले जाईल, आपला ईव्हीएमवर विश्वास नव्हता, आजही नाही, सपाने ८० जागा जिंकल्या तरीही आपण ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही, असे ते म्हणाले.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत