राष्ट्रीय

आगे आगे देखो होता है क्या - नितीन गडकरी

सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असते,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले

वृत्तसंस्था

राज्यातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

“मला वाटते की, महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता हैं क्या? आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल. वैयक्तिक संबंध हे राजकारणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असते,” असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

“सरकारे येतात आणि जातात, पंतप्रधान येत राहतात; पण हा देश राहिला पाहिजे. देशासाठी काम केले पाहिजे. मी राज्यातल्या राजकारणावर जास्त बोलणार नाही; पण शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंदच होईल, इतकेच मी सांगू शकेन. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आहे. त्यांचे माझ्यावर प्रेम होते. मुंबईतील विकासकामांसाठी त्यांनी मला भरपूर मदत केली होती. मी तेव्हाही त्यांचा आदर करत होतो, आजही करतो. उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता पुढे काय आहे, हे देवालाच माहिती असेल. याचे उत्तर येणारा काळच देईल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत