राष्ट्रीय

चार सरकारी विमा कंपन्यांना पाच वर्षांत कोटींचा तोटा

ग्रुप पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणावर जादा दावे दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात म्हटले आहे

वृत्तसंस्था

सर्व चार सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांना गेल्या पाच वर्षांत आरोग्य विमा विभागात २६,३६४ कोटींचा तोटा झाला आहे. ग्रुप पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणावर जादा दावे दाखल झाल्याने मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात म्हटले आहे.

सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा व्यवसायात मोठी घट झाली किंवा दावे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सरासरी तोट्यात मोठी वाढ झाल्याचे ‘कॅग’ने संसदेत सादर केलेल्या अहवालात नमूद केले आह.

न्यू इंडिया ॲश्यूरन्स कंपनी लि. (एनआयएसीएल), युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. (यूआयआयसीएल), आोरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ओआयसीएल) आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. (एनआयसीएल) या सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांचा एकूण तोटा २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत तब्बल २६,३६४ कोटी रुपयो झाला.

आरोग्य विमा व्यवसायात सरकारी विमा कंपन्यांचा व्यवसाय हा दुसऱ्या क्रमांकाचा (पहिल्या क्रमांवर मोटार विमा व्यवसाय) असून ढोबळ थेट प्रिमियम १,१६,५५१ कोटी रुपये पाच वर्षांत २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत जमा झाला हाता. सरकारी सर्वसाधारण विमा कंपन्यांचा आरोग्य विमा व्यवसाय सतत कमी होत असून खासगी विमा कंपन्यांचा व्यवसाय वाढत आहे, असेही निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

कॉम्पट्रोलर ॲण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग)ने अहवालात म्हटले आहे की, अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर २०१२ /मे २०१३ मध्ये मार्गदर्शकतत्वे जाहीर केली आहेत. त्यात ग्रुप पॉलिसीज आणि व्यक्तिगत पॉलिसीज यांचे एकत्रित प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे आणि क्रॉस सबसिडीजसह ग्रुप पॉलिसीजचे प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला