राष्ट्रीय

आर्थिक वर्षात पेट्रोलची विक्री करताना लिटरमागे नुकसान

तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतरही देशांतर्गत बाजारात तेल कंपन्यांनी तेलाच्या दरात गेले काही दिवस वाढ केलेली नाही

वृत्तसंस्था

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या तिमाहीत पेट्रोलची विक्री करताना लिटरमागे १० रुपये नुकसान सोसत आहे तर १ लिटर डिझेलमागे १४ रुपये तोटा सहन करत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सर्वाधिक नुकसान चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झाले आहे, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतरही देशांतर्गत बाजारात तेल कंपन्यांनी तेलाच्या दरात गेले काही दिवस वाढ केलेली नाही. त्यामुळे तेल कंपन्यांच्या तोट्यात वाढ होत आहे.

देशाची सर्वात मोठी तेल तेलशुद्धीकरण आणि किरकोळ इंधन विक्री करणाऱ्या कंपनीच्या अहवालात म्हटले आहे की, एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला किरकोळ इंधन विक्रीतून १,९९२.५३ कोटींची तोटा झाला आहे. गेल्या वर्षी वरील तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा ५,९४१.३७ कोटी रुपये झालाहोता. तर त्याआधीच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत ६,०२१.९ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी

विहिंपच्या भूमिकेवरून वाद; राजकारण तापण्याची शक्यता

GST कपातीचा फायदा; रेलनीर, अमूलच्या किंमतीत घट

अमेरिकेचे व्हिसास्त्र! भारतीयांच्या 'अमेरिकन ड्रीम'ला ट्रम्प यांचा सुरुंग; नव्या H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये शुल्क आकारणार

आदिवासींच्या नापीक जमिनी खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देता येणार; राज्य सरकार स्वतंत्र कायदा करणार - बावनकुळे