राष्ट्रीय

मध्य प्रदेश : विद्यार्थ्यांच्या हातात झाडू-फडका? शाळेतील लहानग्यांच्या व्हिडिओवर भडकले नेटकरी, शिक्षकांवर कारवाईची मागणी

ही घटना छतरपूर जिल्ह्यातील डेहरापहाडी शाळेतील असून, विशेष म्हणजे ही शाळा कलेक्टरांच्या बंगल्याच्या समोर आहे.

Mayuri Gawade

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुले आणि मुली हातात झाडू व फडका घेऊन वर्गाची साफसफाई करताना दिसत आहेत. शाळेच्या गणवेशात असलेली ही मुले पुस्तकं आणि पेन्सिलऐवजी झाडू-फडकी हातात घेत वर्ग झाडताना दिसताच पालक आणि नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना छतरपूर जिल्ह्यातील डेहरापहाडी शाळेतील असून, विशेष म्हणजे ही शाळा कलेक्टरांच्या बंगल्याच्या समोर आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तीन मुली आणि एक मुलगा वर्गात फरशीवर फडका मारताना आणि झाडू मारताना स्पष्टपणे दिसत आहेत.

पालक आणि नेटकऱ्यांचा संताप

व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांनी शाळेच्या शिक्षकांवर आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून, "विद्यार्थ्यांकडून काम करून घेण्याऐवजी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे" अशी टीका केली आहे. सोशल मीडियावरही या घटनेवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन