राष्ट्रीय

आज महाकुंभचा शेवटचा दिवस

महाकुंभचा बुधवारी महाशिवरात्रीला शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करायला मंगळवारी पुन्हा एकदा भाविकांची मोठी गर्दी जमली आहे.

Swapnil S

प्रयागराज : महाकुंभचा बुधवारी महाशिवरात्रीला शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रयागराजच्या संगमावर पवित्र स्नान करायला मंगळवारी पुन्हा एकदा भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. १३ जानेवारीला कुंभमेळा सुरू झाल्यापासून गेल्या ४४ दिवसांत ६४.३३ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ९७.२१ लाख जणांनी स्नान केले. १४४ वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात स्नान करायला भाविक प्रयागराजला जात आहेत. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला स्नान करायला भक्तांची मोठी गर्दी जमणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी झाली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून कुंभमेळा क्षेत्रात प्रशासनाच्या गाड्या सोडून सर्व वाहनांना बंदी घातली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर प्रयागराज संगमापासून १० ते १२ किमीपर्यंत भाविकांना रोखले जाणार आहे. भाविकांनी जवळच्या घाटावर स्नान करावे किंवा घरी जावे. तसेच महाकुंभमध्ये गस्त घालण्यासाठी हवाई दलाचे जवान तैनात केले आहेत.

दिल्ली-प्रयागराज विमान भाडे ३० हजार रुपये

महाशिवरात्रीनिमित्त शेवटचे स्नान करायला भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे दिल्ली ते प्रयागराज विमान भाडे ३० हजार, तर मुंबई-प्रयागराज भाडे २५ हजार रुपयांवर पोहोचले आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे