Mahindra XUV 700 Accident Viral Video Social Media
राष्ट्रीय

महिंद्रा XUV 700 चा टायर फुटला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; सासू-सुनेवर काळाचा घाला, पाहा थरारक Video

या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Naresh Shende

सोशल मीडियावर एका थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक्स्प्रेसवेवर वेगानं धावणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही कारचा टायर फुटला अन् काही सेकंदातच ती कार ट्रकला धडकली. त्यानंतर ती कार रस्त्यावर पलटी झाली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या अपघातात लग्नाला जाणाऱ्या दोन महिलांचा (सासू आणि सून) मृत्यू झाला असून कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आलीय. हा अपघात रविवारी २५ फेब्रुवारीला झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सुसाट धावणारी कार टायर फुटल्यानंतर थेट एक्स्प्रेसवेच्या मधल्या लेनवरुन जाणाऱ्या ट्रकला धडकली. त्यानंतर ती कार काही सेकंदातच पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमध्ये असलेल्या दोन महिला ठार झाल्या आणि इतर चार जण गंभीररित्या जखमी झाले. पूर्वांचल एक्स्प्रेसवेच्या 89-8LHS या मार्गावर ही घटना घडली. लग्नासमारंभासाठी निघालेल्या या कुटुंबावर जीवघेणं संकट ओढावलं.

इथे पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुल अरोरा असं कार चालकाचं नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. जखमींना दर्शन नगर मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघाताचा अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास