राष्ट्रीय

ममतांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करू द्यावे - लालूप्रसाद

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी द्यावयास हवी, असे राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी येथे सांगितले. संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी ममतांनी अलीकडेच दर्शविली होती.

Swapnil S

पाटणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी द्यावयास हवी, असे राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी येथे सांगितले. संधी मिळाल्यास इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी ममतांनी अलीकडेच दर्शविली होती.

विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व ममतांनी करण्यात काँग्रेसला काही अडचण असेल तर त्याने काहीच फरक पडत नाही. ममतांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करू द्यावे, असे यादव म्हणाले. त्यापूर्वी लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही ममतांनी नेतृत्व करण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. इंडिया आघाडीतील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याने नेतृत्व करण्यास काहीच हरकत नाही, मात्र त्याबाबतचा निर्णय एकमताने व्हावयास हवा, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद आणि इंडिया आघाडीचे नेतृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या आपण पार पाडू शकतो, असे ममतांनी स्पष्ट केले होते.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

Filmfare Awards Marathi 2025 : पहिलाच चित्रपट आणि थेट 'फिल्मफेअर'! अभिनेता धैर्य घोलपला ‘एक नंबर’ चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू पुरस्कार

Filmfare Awards Marathi 2025 : क्षितीश दाते ठरला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर; 'या' भूमिकेसाठी मिळाला पहिला फिल्मफेअर!

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार