राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांना गिरगाव दंडाधिकाऱ्यांचा दिलासा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना शुक्रवारी गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा दिला. द्वेषपूर्ण भाषण करुन धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली.

Swapnil S

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना शुक्रवारी गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दिलासा दिला. द्वेषपूर्ण भाषण करुन धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली.

ममता बॅनर्जी यांनी एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. गेल्यावर्षी वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर ममता बॅनर्जी यांनी केलेले विधान द्वेषपूर्ण स्वरुपाचे होते. त्यातून अराजकता निर्माण करण्याचा ममता बॅनर्जींचा उद्देश होता, असा दावा करीत मुंबईतील एका वकिलाने गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकेत बलात्कार-हत्येविरुद्धच्या निदर्शनांमध्ये जमावाने महाविद्यालयाच्या परिसरात हल्ला करून तोडफोड केल्याच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला होता. तथापि, केंद्र किंवा राज्य सरकारच्या परवानगीशिवाय भारतीय न्याय संहितेच्या कलमांखालील गुन्ह्यांची दखल घेतली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत निर्देश देण्यास स्पष्ट नकार दिला.

कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा एक नवा प्रघात; CAG च्या अहवालात ताशेरे

भारत-पाकिस्तान युद्धात ५ विमाने पाडण्यात आली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

...तर 'मविआ'त राहण्यात अर्थ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

गुगल, 'मेटा 'ला ED ची नोटीस; अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरण