राष्ट्रीय

बंगळुरूत कंपनीच्या एमडी, सीईओची तलवारीने हत्या ; माजी कर्मचाऱ्याचे कृत्य

आरोपी व्यवसाय करत होता व कंपनीचे मृत पावलेले अधिकारी त्याच्या व्यवसायात हस्तक्षेप करत होते

नवशक्ती Web Desk

देशाला हादरवून टाकणारी घटना येथे उघडकीस झाली आहे. एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओची तलवारीने हत्या केली आहे. ही घटना घडली तेव्हा दोघेही कार्यालयात होते. दोघांना रुग्णालयात नेताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपी व्यवसाय करत होता व कंपनीचे मृत पावलेले अधिकारी त्याच्या व्यवसायात हस्तक्षेप करत होते. आरोपी फेलिक्स हा एअरोनिक्स कंपनीत काम करत होता. कंपनीचे एमडी फणिंद्र हे आरोपीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. मंगळवारी सायंकाळी फेलिक्स हातात तलवार व चाकू घेऊन कार्यालयात घुसला. त्याने फणिंद्र सुब्रमण्या व वीनू कुमार यांची हत्या केली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी

गर्भधारणा रोखणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोहित कंबोज यांचा राजकारण संन्यास?

सी. पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती; राधाकृष्णन यांना ४५२, तर रेड्डी यांना ३०० मते, विरोधकांची १४ मते फुटली