मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यात राडा Photo : X (ANI)
राष्ट्रीय

मेस्सीच्या कोलकाता दौऱ्यात राडा; सॉल्ट लेक स्टेडियमची तोडफोड, आयोजकांना अटक

तमाम फुटबॉलचाहत्यांचे दैवत असलेल्या लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या कोलकातातील चाहत्यांचा हिरमोड झाला. अवघ्या ५ मिनिटांसाठी मैदानात उतरलेला मेस्सी परत गेल्यामुळे स्टेडियममधील चाहते संतप्त झाले आणि त्यानंतर चाहत्यांनी स्टेडियममधील खुच्र्यांची तोडफोड केली. चाहत्यांनी बॉटल्स, बेल्ट आणि खुर्चा फेकत तसेच होर्डिंग्जची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला.

Swapnil S

कोलकाता : तमाम फुटबॉलचाहत्यांचे दैवत असलेल्या लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या कोलकातातील चाहत्यांचा हिरमोड झाला. अवघ्या ५ मिनिटांसाठी मैदानात उतरलेला मेस्सी परत गेल्यामुळे स्टेडियममधील चाहते संतप्त झाले आणि त्यानंतर चाहत्यांनी स्टेडियममधील खुच्र्यांची तोडफोड केली. चाहत्यांनी बॉटल्स, बेल्ट आणि खुर्चा फेकत तसेच होर्डिंग्जची तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांना अटक केली असून जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या कार्यक्रमात चाहत्यांनी गोंधळ घातल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माफी मागितली आहे.

'मेस्सी मॅजिक' पाहण्यासाठी आलेले चाहत्यांना अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सीला जवळून पाहण्याचे स्वप्न साकारत करता आले नाही. मेस्सी फक्त पाच मिनिटे मैदानात अवतरला. तसेच त्याच्याभोवती आयोजक तसेच पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा गराडा होता. मेस्सीला पाहता न आल्यामुळे चाहते संतापले. त्यांनी नंतर स्टेडियमची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला.

मेस्सी सकाळी ११:१५ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला होता, पण तो लवकर स्टेडियममधून निघून गेला. "कारण मेस्सीने स्टेडियममध्ये पूर्ण फेरी मारली नाही. हा फारच वाईट इव्हेंट होता, तो फक्त अवघ्या काही मिनिटांसाठी आला. सर्व नेते आणि मंत्री त्याला घेरून उभे राहिले. आम्हाला काहीही पाहता आले नाही," असे चाहत्यांनी सांगितले.

मेस्सीच्या फुटबॉल कॉन्सर्टचे मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. कार्यक्रमाच्या गैरव्यवस्थापनाचा ठपका ठेवत दत्ता यांना कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली. कोलकातानंतर हैदराबादला जाणाऱ्या मेस्सी आणि इतर सहकाऱ्यांना सोडण्यासाठी विमानतळावर आले असताना दत्ता यांना ताब्यात घेण्यात आले. पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कुमार यांनी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. तसेच प्रेक्षकांना त्यांचे तिकीटाचे पैसे परत देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मी माफी मागते - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमातील गैरव्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली. "साल्ट लेक स्टेडियमवर मेस्सीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी जात होते. परंतु तिथे जो गोंधळ दिसला, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यामुळे राज्याच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. मी माफी मागते, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

तसेच ममता यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्या. आशीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

Mumbai : गोरेगावच्या महाविद्यालयात ड्रेस कोडवरून वाद; विद्यार्थिनींच्या उपोषणानंतर बुरखा बंदी मागे