राष्ट्रीय

एमएचटी-सीईटी पीसीएम गटाचा निकाल जाहीर; २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (एमएचटी-सीईटी) पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) गटाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण २२ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. एमएचटी-सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (एमएचटी-सीईटी) पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) गटाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण २२ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. एमएचटी-सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे.

१०० पर्सेंटाइल गुण मिळवलेल्या २२ विद्यार्थ्यांच्या यादीत मीर विपुल भुवा, सिद्धांत धीरज पाटणकर, पागार अनुज शिवप्रसाद, नातू ध्रुव अमोल, अथर्व भालचंद्र सहस्रबुद्धे, श्रीश नीलेश पट्टेवार, वाघ पार्थ किशोर, वैष्णवी विठ्ठलराव सर्जे, गंधार विवेक वर्तक, अनिरुद्ध अय्यर, सिद्धांत सुनील घाटे, राय प्रज्वल रवी, अनिल पाटील, प्रणव मिंट्री, चिन्मय चव्हाण, अमित सिंह, आयुष दुबे, मोहम्मद शेख, तन्मय गाडगीळ, अर्णव निगम, उत्कर्ष मिश्रा आणि श्रेया रॉय या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

१९ ते २७ एप्रिलदरम्यान आणि ५ मे २०२५ झालेल्या या परीक्षेत एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ४,२२,६६३ विद्यार्थी उपस्थित होते. ही परीक्षा राज्यातील २०७ आणि राज्याबाहेरील १७ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video