राष्ट्रीय

मोदी आडनाव प्रकरण : राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली

गुजरात उच्च न्यायालयात देखील शिक्षेला स्थगिती देणारी याचिका दाखल केली गेली होती. मात्र, गुजरात न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता

नवशक्ती Web Desk

मोदी आडनाव मानहानी प्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात २१ जुलै रोजी याप्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात देखील शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली होती. मात्र, गुजरात न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हाण देणारी याचिका राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही याचिका दाखल केली आहे. मोदी आडनाव प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. गुजरात हायकोर्टाने ही शिक्षा कायम असणार आहे. असं सांगत शिक्षेला स्थगिती देणारी याचिका फेटाळली होती.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली होती. यावर भाजपचे गुजरातमधील आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोव वर्षाची शिक्षा सुनावली होती. यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द झाली होती.

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

Mumbai : बेस्ट, रेल्वे, MMRDA पालिकेचे थकबाकीदार; पाण्याच्या बिलापोटी चार हजार कोटी थकवले

भटक्या श्वानांना आता कायमस्वरूपी निवारा; निर्बीजीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बदलणार, प्रती श्वान १५५ रुपये खर्च करणार

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान