मोहन भागवत  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

अतिरेक्यांना धडा शिकवणे हे आपले धर्मकार्य- मोहन भागवत

नवी दिल्ली: समाज आणि राष्ट्रावर होणाऱ्या संकटांचा मुकाबला करणेही गरजेचे असल्याचे सांगतानाच, अतिरेक्यांना धडा शिकवणे हेसुद्धा आपले धर्मकार्य आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी आज ठणकावले.

Swapnil S

नवी दिल्ली: समाज आणि राष्ट्रावर होणाऱ्या संकटांचा मुकाबला करणेही गरजेचे असल्याचे सांगतानाच, अतिरेक्यांना धडा शिकवणे हेसुद्धा आपले धर्मकार्य आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी (दि.२७) ठणकावले.

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भागवत म्हणाले, ‘अहिंसा आपला स्वभाव आहे, आपली मूल्ये आहेत. पण काही लोक बदलत नाहीत; कितीही प्रयत्न केले तरी ते जगाला त्रास देत राहतात. अशा वेळी काय करायचं?

रामायणातील एका उदाहरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, ‘अहिंसा हा आपला धर्म आहे. परंतु जर कोणी वाईट मार्गावर चालत असेल, तर त्याला थांबवणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांना कधीही त्रास देत नाही. पण जर कोणी वाईट मार्गावर गेला, तर दुसरा कोणता पर्याय उरतो? राजा म्हणून लोकांचे रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्य आहे...’

भागवत पुढे म्हणाले, ‘जर सत्य ओळखायचे असेल, तर कोणत्याही एकट्या व्यक्तीमध्ये पूर्ण सत्य समजून घेण्याची शक्ती नसते. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून सत्य सांगतो. सर्वांचे विचार ऐकून जर एकमत झाले, तर ते प्रस्ताव अधिक खरी ठरते आणि त्यावर निर्णय होतो.’

यापूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात, पहलगाम हल्ल्यानंतर भागवत यांनी म्हटले होते की, सध्याची लढाई पंथ व धर्म यांच्यात नाही, तर 'धर्म' आणि 'अधर्म' यांच्यात आहे. भागवत म्हणाले, ‘आमचे सैनिक किंवा आपले लोक कधीही कोणाच्या धर्मावरून चौकशी करून हत्या करत नाहीत. पण कट्टरपंथीयांनी लोकांचे धर्म विचारून त्यांना ठार मारले. हिंदू कधीही असे करत नाहीत. म्हणूनच देशाला मजबूत असले पाहिजे.’

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video