राष्ट्रीय

मान्सून प्रगतीपथावर, २४ तासात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

असह्य उकाड्यामुळे गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून अंगाची काहिली सोसणाऱ्या देशवासीयांसाठी हवामान खात्याने एक दिलासादायक वृत्त दिले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : असह्य उकाड्यामुळे गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून अंगाची काहिली सोसणाऱ्या देशवासीयांसाठी हवामान खात्याने एक दिलासादायक वृत्त दिले आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माणझाले असून येत्या २४ तासात केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सध्या मान्सूनचा प्रवास समाधानकारक असून पतो असाच कायम राहिला तर महाराष्ट्रातही यंदा वेळेवर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. केरळसमवेतच येत्या २४ तासात मान्सून ईशान्येकडील काही भागांमध्येही सक्रिय होणार असून वाटचाल अशीच कायम राहिल्यास तो गोव्यात ५ जून रोजी दाखल होईल तरतळकोकणात ६ जून रोजी दाखल होईल.त्यानंतर मध्य महाराष्ट्रात १० जून आणि तेथून पुढे १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनसाठीच्या पोषक वातावरणात दिवसेंदिवसप्रगती होत असून तो ५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापून टाकेल.

यंदा पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला होता.बळीराजाही त्यामुळे सुखावणार आहे,मराठवाड्यात अनेक भागांमध्ये सध्या दुष्काळसदृश स्थिती आहे,टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस वेळेवर आल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश