राष्ट्रीय

Monu Manesar: दोन मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याचा आरोप असणाऱ्या मोनू मानेसरला अटक

हरयाणातील नूह कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून इथल्या हिंसाचाराला मानेसरने केलेली सोशल मीडिया पोस्ट कारणीभूत ठरली आहे.

नवशक्ती Web Desk

राजस्थानातील नासिर आणि जुनैद नामक दोन मुस्लिम तरुणांना जिवंत जाळ्याप्रकरणी कथीत गोरक्षक मोनू मानेसरला हरयाणा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सात महिन्यांनंतर अटक झाली आहे.

हरयाणा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. नूह कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हरयाणातील नूंह इथल्या हिंसाचाराला मानेसरने केलेली सोशल मीडिया पोस्ट कारणीभूत ठरली आहे.

आयएमटी मानेसर इथं हरयाणा पोलिसांच्या सीआयए स्ठाफने मंगळवारी मोनूला अटक केली. पोलिसांनी साध्या वेशात त्याला अटक केली आहे. याबाबतच सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोनू मानेसरला त्यांनी अटक केली नसून सीआयए स्टाफनं त्याला ताब्यात घेतलं आहे.

स्वताला गोरक्षक म्हणवून घेणारा मोनू मानेसर हा जुनैद आणि नासिर यांच्या यांना जिवंत जाळल्यानंतर फरार होता. १६ फेब्रुवारी रोजी हरयाणाच्या भिवानीमध्ये बोलेरे इंथं दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाले होते. तपासाअंती हे दोन्ही मृतदेह राजस्थानच्या गोपालगढमधील जुनैद आणि नासिर यांचे होते. हरयाणातील गोरक्षकांवर या दोन मुस्लिम तरुणांच्या हत्येचा आरोप होता. यात मोनू मानेसर ऊर्फ मोहित यादव हा सर्वाधिक चर्चेत होता.

मोनू मानेसर ऊर्फ मोहित यादव हा बजरंग दलाचा सदस्य आणि गोरक्षक असून तो हरयाणातील गुरुग्राममधील मानेसरचा रहिवासी आहे. तो बजरंग दलाच्या गाय रंरक्षण टास्क फोर्स तसंच गोरक्षक दलाचा प्रमुख म्हणून देखील ओळखला जातो. ३१ जुलै २०२३मध्ये हरयाणातील नूंह याठिकाणी हिंसाचार भडकवल्याप्रकरणात देकील त्याच्या नावाचा समावेश होता. दरम्यान, या हिंसाचारातील प्रमुख आरोपी बिट्टू बजरंगीचा एक भडकाऊ व्हिडिओ देखील समोर आला होता.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री