राष्ट्रीय

भारत चीनच्या जीडीपी दराची बरोबरी करू शकत नाही; मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालातील दावा

भारत चीनच्या मागील ८-१० टक्के जीडीपी वाढीची बरोबरी करू शकत नाही, असा दावा मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात करण्यात आला आहे. तसेच...

Swapnil S

नवी दिल्ली : भारत चीनच्या मागील ८-१० टक्के जीडीपी वाढीची बरोबरी करू शकत नाही, असा दावा मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात करण्यात आला आहे. तसेच दक्षिण आशियाई राष्ट्राच्या संभाव्य विकासाबद्दल आशावादी असल्याचेही मॉर्गन स्टॅन्लेचे आशियातील मुख्य अर्थतज्ज्ञ म्हटल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.

मॉर्गन स्टॅन्लेचे आशियातील मुख्य अर्थतज्ज्ञ चेतन अह्या यांनी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दीर्घकाळात भारताची अर्थव्यवस्था ६.५ टक्के ते ७ टक्क्यांपर्यंत स्थिरपणे वाढेल. दक्षिण आशियाई राष्ट्र जागतिक उत्पादन केंद्र म्हणून आपल्या मोठ्या प्रतिस्पर्ध्याची जागा घेण्यापासून दूर आहे, असेही ते म्हणाले. १९७८ मधील आर्थिक सुधारणांनंतर तीन दशकांत चीनची वाढ दर वर्षी सरासरी १० टक्के होती, असे अधिकृत आकडेवारी दर्शवते. पायाभूत सुविधांचा अभाव आणि कमी कुशल मनुष्यबळ यामुळे भारतातील आर्थिक प्रगती खुंटली आहे, असे अह्या म्हणाले.

या दोन्ही अडचणी लक्षात घेता आम्हाला विश्वास आहे की भारताची वाढ मजबूत होणार आहे, परंतु ८ ते १० टक्क्यांऐवजी ६.५ टक्के ते ७ टक्क्यांच्या दरम्यान राहील. योगायोगाने, मॉर्गन स्टॅनलीने दुसऱ्या अहवालात म्हटले होते की, गुंतवणुकीच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारताचा सध्याचा जागतिक आर्थिक विकास दर २००३-०७ सारखाच असून तेव्हा वाढ सरासरी ८ टक्क्यांहून अधिक होती.

‘द व्ह्यूपॉईंट : इंडिया - २००३-२००७ सारखे का वाटते’ या शीर्षकाच्या अहवालात मॉर्गन स्टॅन्ले म्हणाले की, जीडीपीमधील गुंतवणुकीच्या दशकानंतर सातत्याने घट होत असताना प्रामुख्याने सरकारच्या भांडवली खर्चामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. त्यामुळे सध्याचा विस्तार २००३-०७ च्या तुलनेत अगदी जवळचा आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास