@IAMINDIAN345/ X
राष्ट्रीय

जमशेदपूरजवळ मुंबईहून जाणारी हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरली, ६ जण जखमी; Video

Mumbai-Bound Howrah Express Accident: दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागांतर्गत जमशेदपूरपासून ८० किमी अंतरावर बारांबूजवळ पहाटे ३.४५ वाजता हा अपघात झाला.

Tejashree Gaikwad

झारखंडच्या सरायकेला-खरसावन जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मुंबई-हावडा मेलचे किमान १८ डबे रुळावरून घसरल्याने सहा जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागांतर्गत जमशेदपूरपासून ८० किमी अंतरावर बारांबूजवळ पहाटे ३.४५ वाजता हा अपघात झाला.

एसईआरचे प्रवक्ते ओम प्रकाश चरण यांनी सांगितले की जवळच मालगाडीचा आणखी एक टप्पा रुळावरून घसरला होता, परंतु हे दोन्ही अपघात एकाच वेळी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. "सकाळी ३.४५ वाजता एसईआरच्या चक्रधरपूर विभागातील बारांबू स्टेशनजवळ नागपूरमार्गे जाणाऱ्या २२ डब्यांच्या १२८१० हावडा-मुंबई मेलचे किमान १८ डबे रुळावरून घसरले," असे त्यांनी सांगितले.

यापैकी १६ प्रवासी डबे, एक पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कार होती, अशीही माहिती त्यांनी दिली.

यामध्ये काही प्रवाशांना दुखापत झाल्याचेही चरण यांनी सांगितले. "अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आणि त्यांना बाराबांबू येथे वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. त्यांना आता पुढील उपचारांसाठी चक्रधरपूरला नेण्यात येत आहे. तसे बचावकार्य सुरू आहे." असे एसईआरच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे अपघाताचे डिलेट्स

सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील खरसावन ब्लॉकमधील पोटोबेडा येथे रेल्वे अपघात झाल्याचे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर