राष्ट्रीय

दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

कानपूरची घटना; प्रेमावरून वाद झाल्याचा संशय

नवशक्ती Web Desk

कानपूर : मुलीच्या वादातून एका विद्यार्थ्याने प्रयाग विद्यामंदिर इंटर कॉलेजमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची वर्गात चाकू भोसकून हत्या केली आहे. एका मुलीवरून दोघांमध्ये शनिवारी भांडण झाले होते. त्यावरून ही हत्या झाली असावी, असा संशय आहे.

मृत नीलेंद्र तिवारी हा १५ वर्षांचा, तर आरोपी १३ वर्षांचा आहे. शनिवारी दोघांमध्ये वाद झाला होता. पण, मित्रांनी त्याचे भांडण सोडवले होते. मात्र, सोमवारी वर्गात पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. आरोपी व नीलेंद्र यांची चांगली मैत्री होती. पण, त्यांच्यासोबत शिकणाऱ्या मुलीशी नीलेंद्र गप्पा मारू लागला. आरोपीला ही बाब आवडली नाही. तो नीलेंद्रवर नाराज होता.

सोमवारी आरोपीने बॅगमध्ये चाकू ठेवला होता. त्याने नीलेंद्रच्या पोटात व गळ्यावर अनेक वार केले. यानंतर तातडीने नीलेंद्रला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी शाळेत जाऊन आरोपी विद्यार्थ्याची चौकशी केली. नीलेंद्रने आरोपीला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आरोपी घाबरला होता. त्यानंतर आरोपीने नीलेंद्रच्या हत्येचा कट आखला. घरातून त्याने चाकू घेऊन तो शाळेत गेला. जेवणाच्या सुट्टीत त्याने नीलेंद्रला धक्का मारून जमिनीवर पाडले. तेथे त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी