एक्स @tuhinsant
राष्ट्रीय

नैनितालमध्ये बस दरीत कोसळून ३ ठार, २४ जण जखमी

नैनितालमध्ये बस खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून २४ जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

नैनीताल : नैनितालमध्ये बस खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून २४ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बस पिठोरगढहून हल्द्वानीला जात असताना भीमतालजवळ हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असल्याचे सांगण्यात येत आहे. बस खोल दरीत कोसळल्याने मदतकार्य पोहोचण्यास अडथळे येत आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भीमताल बस अपघाताबाबत सोशल मीडिया एक्सवर माहिती शेअर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भीमतालजवळ बस अपघात झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्थानिक प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती