संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

मोदी मोडणार नेहरूंचा विक्रम; ४३९८ दिवस पंतप्रधानपदी

येत्या ९ जूनला नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नोंदवणार आहेत. ते दिवंगत माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा ४३९७ दिवसांचा पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : येत्या ९ जूनला नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम नोंदवणार आहेत. ते दिवंगत माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा ४३९७ दिवसांचा पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडणार आहेत.

९ जून रोजीच पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. १० जून रोजी होणाऱ्या रालोआच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करून पंतप्रधान मोदींचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले जाईल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम‌्चे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू हा प्रस्ताव मांडतील. इतर मित्रपक्षांचे नेते या प्रस्तावाला पाठिंबा देतील. या प्रस्तावात पंतप्रधान म्हणून त्यांच्या गेल्या बारा वर्षांतील कामगिरीचा उल्लेख केला जाईल.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. ते सलग ४,३९७ दिवस म्हणजेच १२ वर्षे १४ दिवस पंतप्रधान राहिले होते. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी ९ जून रोजी त्यांचा हा विक्रम मोडीत काढतील आणि निर्वाचित पंतप्रधान म्हणून सलग ४,३९८ दिवस म्हणजेच १२ वर्षे १५ दिवस पूर्ण करतील.

सरकारचे प्रमुख म्हणून ९ हजार दिवस पूर्ण

७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासून ते सातत्याने सरकारचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ७ ऑक्टोबर २००१ ते २२ मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर २६ मे २०१४ पासून आतापर्यंत पंतप्रधान म्हणून ते कार्यरत आहेत. अशा प्रकारे, मोदींनी निवडून आलेल्या सरकारांचे प्रमुख म्हणून ९,००० हून अधिक दिवस पूर्ण केले आहेत.

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार