राष्ट्रीय

NIA ने मोठा कट उधळला! राज्यभरात ४४ ठिकाणी छापेमारी; इसिसच्या १५ संशयित दहशतवाद्यांना अटक

नवशक्ती Web Desk

राष्ट्रीय तपास एजन्सी आणि दहशतवादी पथककाडून राज्यात ४४ तर कर्नाकटकात एका छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित व्यक्तींमध्ये घाटकोपर ट्रेन ब्लास्टमधील साकीब नाचन आणि त्याचा मुलगा शामिन नाचन या दोघांचा देखील समावेश आहे. साम टिव्ही या मराठी वृत्तवाहिनीने याबाबतच वृत्त दिलं आहे.

अटक करण्यात आलेल्या १५ संशयित दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठा कट उधळण्यास NIA आणि ATS ला यश आलं आहे. मिळालेल्या माहितीवरुन या कारवाईत इसिसचं नेटवर्क नष्ट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई-पुण्यात दोन बाईक चोरांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात इसिसच्या नेटवर्कचा खुलासा झाला होता. यानंतर पूणे पोलिसांनी तपासाची सुत्रे एटीएसकडे सोपवली होती. यानंतर या प्रकरणातील व्यक्ती खूपच मोठी असल्याचं समोर आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडे दिलं गेलं होतं.

यानंतर एनआयएने या प्रकरणी कारवाई करत आज पहाटेपासून मुंबई-पुण्यासह ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भायंदर आणि कर्नाटकात एकाच वेळी छापेमारी केली. यात कर्नाटकातून १, पुण्यातून २ ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भायंदरमध्ये १ अशा ४४ ठिकामी छापेमारी केली. या छापेमारीनंतर १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या छापेमारीत संशयिकांकडून बॉम्बस्फोटांसाठी लागणारं साहित्य, कागदपत्रे, बेहिशोबी रोकड, बंदूक, इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा स्फोटाला कट उधळला गेला आहे. एनआयएने अटक केलेल्या संशयित दहशतवद्यांना मुंबई येथील पेडर रोडवरील एनआयएच्या कार्यालयात आणण्यात येणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस