राष्ट्रीय

एनआयएची सहा राज्यांतील १३ ठिकाणी छापेमारी; कागदपत्रे, संशयास्पद साहित्य केले जप्त

वृत्तसंस्था

‘एनआयए’ने रविवारी देशातील सहा राज्यांतील १३ ठिकाणी संशयितांचे घर, तसेच इतर परिसरावर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यात ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे. ‘एनआयए’ने मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद तर महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण १३ ठिकाणांवर ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे.

कागदपत्रे, संशयास्पद साहित्य जप्त

‘एनआयए’ने यूएपीए कायद्याच्या १८, १८ बी, ३८,३९ आणि ४० तसेच भारतीय दंड संहितेच्या करलन १५३ ए आणि १५३ बी कलमांतर्गत २५ जून २०२२ रोजी दहशतवादी संघटना ‘इसिस’शी संबंधित एका गुन्ह्याची नोंद केली होती. याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ‘एनआयए’ने ही कारवाई केली आहे. या कारवाईत संशयित १३ ठिकाणांवरून कागदपत्रे, तसेच संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रात नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यात ‘एनआयए’ने छापेमारी केली आहे. कोल्हापूरमधील हुपरी येथून ‘एनआयए’ने इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शेख या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पहाटे ४ वाजता ही कारवाई करण्यात आली.

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

पत्नीची हत्या करून पतीचे पलायन; अपघाताचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, आरोपी सासूला अटक

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

पत्रकाराच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

Ruslaan Box Office: सलमान खानच्या मेहुण्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला, ७ दिवसात बॉक्स ऑफिसला केलं अलविदा!